भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : राज्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या निर्णयाला काही ठिकाणी नागरिकांकडून विरोध होत असतानाच, स्मार्ट मीटरबाबतचे गैरसमज दूर करून ग्राहकांना वस्तुस्थितीची माहिती देण्यासाठी महावितरणतर्फ नागपूर परिमंडळात (ेङ्मल्ली) व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत बुधवारी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील विविध उपविभागांमध्ये एकूण २०० जनजागृती शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांत वाढीव वीज बिलाच्या १०५४ तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी ९२७ तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात आले. अनेक ठिकाणी स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढेल, मीटरवरून ग्राहकांचे नियंत्रण कमी होईल किंवा वीजपुरवठ्यावर परिणाम होईल, अशा प्रकारच्या शंका नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
या पार्श्वभूमीवर महावितरणच्या अधिकाºयांनी नागरिकांशी थेट संवाद साधत स्मार्ट मीटरची कार्यपद्धती, त्याचे तांत्रिक स्वरूप, बिलिंग प्रक्रियेतील पारदर्शकता, वीज वापरावर नियंत्रण तसेच ग्राहकांना उपलब्ध होणाºया सुविधांची सविस्तर माहिती दिली. यावेळी स्मार्ट मीटरबाबतचे गैरसमज दूर करण्यावर विशेष भर देण्यात आला. या शिबिरांमधून वाढीव वीज बिलांच्या नागपूर ग्रामिण मंडळात ३९३, नागपूर शहर मंडळात (उ्र१ू’ी) ५५६ तक्रारी प्राप्त झाल्या तर वर्धा मंडळात (उ्र१ू’ी) १०५ अशा एकूण १,०५४ तक्रारी प्राप्त झाल्या यापैकी नागपूर ग्रामिण मंडळातील (उ्र१ू’ी) सर्व ३९३, नागपूर शहर मंडळातील ४४४ तर वर्धा मंडळातील ९० अशा एकूण ९२७ तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात आले. वाढीव वीज बिलाच्या तक्रारीशिवाय इतर १६२ तक्रारी प्राप्त झाल्या त्यांचे देखील तात्काळ निराकरन करण्यात आले.
या शिबिराला भेट देणा-या तब्बल ७ हजार ७२६ नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना अधिकाºयांनी उत्तरे देत स्मार्ट मीटरचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही करून दाखविले. त्यामुळे ग्राहकांना मीटरची कार्यपद्धती प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. या मोहिमेदरम्यान नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता नाईक, अधीक्षक अभियंता संजय वाकडे (नागपूर ग्रामीण), प्रफुल लांडे (नागपूर शहर) आणि स्मिता पारखी (वर्धा) यांनी स्वत: उपस्थित राहून ग्राहकांशी संवाद साधला. “स्मार्ट मीटरमुळे अचूक रीडिंग आणि पारदर्शक बिलिंग मिळणार असून, ग्राहकांना वीज वापरावर पूर्ण नियंत्रण ठेवणे सोपे होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, शंका असल्यास थेट महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या अभियानात परिमंडलातील महावितरणचे अभियंते, तांत्रिक कर्मचारी आणि संबंधित अधिकारी सक्रियपणे सहभागी झाले. भविष्यातही ग्राहकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी अशा जनजागृती मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असून, ग्राहकांच्या तक्रारींचे तत्परतेने निराकरण करण्यावरही भर दिला जाणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले.