‘कनेक्ट विथ कलेक्टर’:जेन झी तरुणांशी संवाद साधणार जिल्हाधिकारी

Google लिंक भरून कार्यक्रमात सहभागी व्हावे; जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी
भंडारा : डिजिटल युगात संवाद आणि कनेक्टिव्हिटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याच संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील तरुणांशी थेट संवाद साधण्यासाठी ‘कनेक्ट विथ कलेक्टर’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने मंगळवार, दि. २५ ऑगस्ट रोजी सहायक आयुक्त, समाज कल्याण सभागृहात ‘कनेक्ट विथ कलेक्टर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी जिल्ह्यातील तरुण-तरुणी व विद्यार्थीयांशी अनौपचारिक संवाद साधणार आहेत.

या संवादातून तरुणांच्या मनातील आकांक्षा, भविष्यासंदर्भातील विचार, शिक्षण व रोजगाराच्या संदर्भाबच्या अपेक्षा तसेच भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्या कल्पना व सूचना जाणून घेण्यात येणार आहेत. तरुणाईच्या कल्पकतेला जिल्ह्याच्या विकासाशी जोडण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील १८ ते २५ वयोगटातील जेन झी तरुण-तरुणींनी Google लिंक भरून नोंदणी करावी. नोंदणी केलेल्या पहिल्या १०० तरुण-तरुणींना कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.

नोंदणीसाठी Google लिंक : https://script.google.com/macros/s/AKfycbYOg_3UNCmZpGGMqtrf5JhI3T9j8QNs6Bv7jfq5o4vz1JRtHpUhXUa2hR43wVGmirX4tw/exec

तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या कल्पना, अपेक्षा आणि भंडारा जिल्ह्याच्या विकासाबाबतचे विचार जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत थेट पोहोचवावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *