मुस्लिम लायब्ररी भंडारातर्फे २१ डॉक्टरांचा सत्कार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मुस्लिम लायब्ररी, भंडारातर्फे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या एकूण २१ डॉक्टरांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी डॉक्टरांसह त्यांच्या पालकांचाही सन्मान करण्यात आला. सत्कार करण्यात आलेल्या डॉक्टरांमध्ये एकाच कुटुंबातील सहा डॉक्टरांचा समावेश होता. त्यामध्ये डॉ. आदिल आबिद सिद्दीकी, डॉ. इफ्फत आदिल सिद्दीकी आणि डॉ. आकिब आबिद सिद्दीकी यांच्यासह कुटुंबातील सहा डॉक्टरांचा गौरव करण्यात आला. यावेळी वक्त्यांनी सांगितले की, या गुणवंत डॉक्टरांशी तसेच त्यांच्या पालकांशी संवाद साधून त्यांचे मार्गदर्शनकरण्याची संधी मिळणे ही अभिमानाची बाब आहे. डॉक्टर होण्यासाठी मुलांची मेहनत महत्त्वाची असतेच; मात्र त्यामागे पालकांचे कष्ट, त्याग आणि मार्गदर्शन यांचीही मोठी भूमिका असते. अशी कुटुंबे समाजासाठी प्रेरणादायी ठरतात.

एकाच कुटुंबातील सहा सदस्यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करणे ही निश्चितच गौरवाची बाब आहे. या डॉक्टरांनी मेहनत आणि जिद्दीच्या बळावर कुटुंबाचे नाव उज्ज्वल करण्यासोबतच समाजसेवेची महत्त्वाची जबाबदारीही स्वीकारली आहे.या सत्कार समारंभाच्या माध्यमातून मुस्लिम लायब्ररीने शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रात प्रगती करणाºया युवकांचे मनोबल वाढविण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला. या सन्मानाबद्दल मुस्लिम लायब्ररीचे पदाधिकारी तसेच भंडारा मुस्लिम समाजाचे मन:पूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. अशा प्रकारचे सन्मान युवकांना पुढे जाण्यास आणि समाजसेवेची प्रेरणा देण्यास निश्चितच उपयुक्त ठरतात. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर नागरिक, समाजबांधव आणि लायब्ररीचे पदाधिकारी यांनी सर्व सन्मानित डॉक्टर व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *