प्रवाशाचा धावत्या बसमध्येच मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : आज दांडेगाव येथील वृद्ध मुंडीकोटा बस स्टॉप वरून तिरोडा येथे येण्याकरिता बसमध्ये बसला असता अचानक प्रकृती बिघडल्याने चालक वाहकांनी त्यास उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे नेण्यात आले तिथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. आज दिनांक २४ रोजी तिरोडा आगाराची बस क्रमांक एम एच ४० वाय ५५९६ तुमसर माणेक नगर तिरोडा तुमसर कडून तिरोडाकडे येत असता मुंडीकोटा बस स्थानकावरून तिरोडा येथे येण्याकरिता बसलेले दांडेगाव येथील प्रताप आत्माराम बोंबर्डे ७७ वर्ष याची पांजरा गावा जवळ अचानक प्रकृती बिघडली. चालक वाहकांनी बस थांबवून पाहणी केली असता वृध्दाची प्रकृती गंभीर वाटल्याने त्याला ताबडतोब बस उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे नेण्यात आले तिथे डॉक्टरांनी तपासून सदर वृद्धाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तिरोडा पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *