भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पक्ष मजबूत करायचे असेल तर गरिबांची कामे करा, त्यांना शासनाच्या योजना मिळवून द्या तरच त्यांच्याशी तुमची नाळ जुडेल. लोकांमध्ये संपर्क वाढला कि पक्षाला बळ मिळेल. फक्त पद मिळाल्याने पक्ष मजबूत होत नाही असे विचार आम. नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केले. ते भंडारा जिल्हा शिवसेना संघटनेच्या आढावा बैठकीत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. या बैठकीत जिल्हा प्रमुख अनिल गायधने, लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर यांच्यासह अन्य पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष म्हणजे या वेळी छावा चालक मालक संगठ्नेचे आणि सावरी जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रहर संगाठ्नेच्या पदाधिकाºयांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे आ. भोंडेकर यांनी भगवा दुपट्ट्याने स्वागत केले. बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच आनंद दिघे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने करण्यात आली.त्या नंतर जिल्हा प्रमुख अनिल गायधने यांनी जिल्ह्यातील संघटनेचा आढावा दिला.
याचप्रमणे जिल्ह्यातील सातही तालुक्यातून आलेल्या तालुका प्रमुखांनी आपल्या क्षेत्रातील आढावा प्रस्तुत करून त्यांना येणाºया समस्या ठेवल्या. ज्यावर तोडगा काढण्याकरिता आता तालुका स्तरावर पत्येक महिन्याला एक बैठक घेण्याचे आश्वासन आम. नरेंद्र भोंडेकर यांनी दिले. आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार भोंडेकर पुढे म्हणाले कि, पुढील गेल्या विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीतपक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामे केली असली तरीही आज पक्ष जिल्ह्यात पाहीजे तसा मजबूत नाही आहे. त्याकरिता पदाधिकाºयांनी आपल्या क्षेत्रातील गोर गरिबांची कामे करून देणे तसेच शासनाच्या योजना गरजूंना मिळवून देण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे नागरिकांची नाळ पक्षाशी जुळून येईल आणि पक्ष बांधनीला आधार मिळेल. या करिता पक्षाच्या पदाधिकाºयांमध्ये आत्मविश्वास असणे आवश्यक आहे.
आ.भोंडेकर पुढे म्हणाले कि भंडारा नगर परिषदेचा ३२ कोटींचा असलेला बजेट हा गेल्या काळात १०० कोटी पर्यंत गेला. ज्या मुळे विकास काम शक्य झाली. पुढे जिल्हा परिषदपंचायत समितीत्यांची निवडणुका आहेत, त्यात आपले अधिकाधिक उमेदवार कसे निवडून येतील या करिता पदाधिकाºयांनी आपल्या क्षेत्राचा सर्व्हे करून काम करणे गरजेचे झाले आहे. तरच जिह्यातील संपूर्ण जिल्हा परिषद आणि पंचायतीं निवडणुका लढणे शक्य होईल. एवढेच नाही तर शिवसैनिक म्हणून आपल्या क्षेत्रात ओळख निर्माण झाली पाहिजे. कुणी जर विकासकामांच्या विरोधात गेला तर त्याला शिवसेनेच्या पद्धतीने उत्तर देणे गरजेचे आहे. या सर्व बाबींकडे लक्ष द्याल तरच आपला पक्ष जिल्ह्यात क्रमांक एक वर यायला वेळ लागणार नाही असे आ.भोंडेकर यांनी सांगीतले. बैठकीचे संचालन उपजिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे यांनी केले. या वेळी मंचावर उप जिल्हा प्रमुख विकास मदनकर, उप जिल्हा प्रमुख विजय काटेखाये, उप जिल्हा प्रमुख किशोर पंचभाई, उप जिल्हा प्रमुख नरेश उचीबगले, महिला आघाडी जिल्हा प्रमुख साविताताई तुरकर, युवा सेना प्रमुख अंकुश वंजारी, नितीन सेलोकर, माजी जिला परिषद उपाध्यक्ष दीपक गजभिये, न.प. गटनेता राजू धुर्वे, जिल्हा संघटक नितीन धकाते, भंडारा तालुका प्रमुख संजय आकरे, दत्तू जगनाडे, पवनी तालुका प्रमुख जितेश इखार, व रोशन काटेखाये, माजी नगराध्यक्ष बाबू बागडे, मुकेश थोटे, नगर सेवक विनयम्हण पाशिने, पूर्व विदर्भ सचिव शुभम नवले, भंडारा महिला तालुका प्रमुख विद्या मेहर सह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.