भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : वीजबिलापोटी असलेल्या थकबाकीची वसुली करण्यासाठी महावितरणतर्फे राज्यभरात अत्यंत कठोर पावले उचलण्यात येत असून, याचा प्रत्यय नुकताच सलग सुट्ट्यांच्या दिवशी आला. शनिवार व रविवार या सुट्ट्यांच्या दिवशीही नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात महावितरणच्या अधिकारी व कर्मचाºयांनी विश्रांती न घेता थकबाकी वसुलीची मोहीम अतिशय आक्रमकपणे राबविली. मोहिमेदरम्यान अधिकाºयाांनी थकबाकीदार ग्राहकांच्या थेट घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना वीजबिलांचा नियमित भरणा करण्याचे नम्र आवाहन केले. तसेच, वारंवार सांगून व संधी देऊनही थकबाकीचा भरणा न करणाºयाा ग्राहकांचा वीजपुरवठा जागीच खंडित करण्याची कठोर का- रवाई करण्यात आली.
या विशेष मोहिमेचे महत्त्व लक्षात घेता, महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक हे स्वत: मैदानात उतरले होते. त्यांनी मानेवाडा आणि खापरी भागात प्रत्यक्ष उपस्थित राहून वसुली मोहिमेत सहभाग घेतला, तर सोमवारी त्यांनी हिंगणघाट येथील मोहिमेची धुरा सांभाळत प्रत्यक्ष पाहणी केली. या व्यापक मोहिमेत नागपूर ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता संजय वाकडे, नागपूर शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता प्रफुल लांडे, वर्धा मंडलच्या अधीक्षक अभियंता स्मिता पारखी यांच्यासह परिमंडलातील सर्व कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, सहायक अभियंते तसेच तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने व उत्साहाने सहभागी झाले होते. थकबाकीदारांविरुद्ध महावितरणने आता पूर्णपणे कंबर कसली असून संपूर्ण परिमंडलात ही मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, या मोहिमेदरम्यान वीजपुरवठा खंडित केल्यानंतर अनेक ग्राहक शेजाºयाांकडून वायर टाकून बेकायदेशीरपणे वीज वापरत असल्याचे समोर आले आहे.
अशा प्रकारांची गंभीर दखल घेत महावितरणने आता थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा कडक इशारा दिला आहे. कायदेशीर तरतुदीनुसार, थकबाकीमुळे अधिकृत वीज कापली गेल्यानंतर शेजाºयााकडून वीज घेणे हा अत्यंत गंभीर गुन्हा असून ती थेट ‘वीजचोरी’ (ए’ीू३१्रू्र३८ ळँीा३) मानली जाते. या प्रकरणी महावितरण संबंधित ग्राहकावर तत्काळ पोलीस तक्रार करून कायदेशीर कारवाई करणार आहे. भारतीय वीज कायद्यानुसार वीज विक्री आणि वितरणाचे सर्व कायदेशीर हक्क केवळ महावितरणकडेच सुरक्षित आहेत. त्यामुळे कोणताही ग्राहक आपल्या घरचे कनेक्शन इतरांना देऊ शकत नाही; असे करणे पूर्णपणे नियमबाह्य असून तो वितरणाच्या अधिकाराचा थेट भंग ठरतो. याशिवाय, जर एखाद्या ग्राहकाचे एकाच नावावर दोन वेगवेगळे कनेक्शन असतील आणि एका ठिकाणची थकबाकी भरली गेली नाही, तर ती थकबाकीची रक्कम संबंधित ग्राहकाच्या दुसºयाा सक्रिय कनेक्शनवर वळती केली जाणार आहे.
परिणामी, वेळेवर पैसे न भरल्यास ते दुसरे चालू कनेक्शनदेखील खंडित केले जाऊ शकते. आगामी काळातील वीजवितरण प्रणाली आणखी पारदर्शक करण्यासाठी नवीन स्मार्ट मीटर प्रणालीमध्ये ‘आॅटो डिस्कनेक्ट’ (अ४३ङ्म ऊ्र२ूङ्मल्लीू३) ही अत्याधुनिक सुविधा समाविष्ट करण्यात आली आहे. ठरवून दिलेल्या मुदतीत बिल न भरल्यास मानवी हस्तक्षेपाशिवाय या प्रणालीद्वारे आपोआप वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे ग्राहकांनी वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी विहित मुदतीत आपली देयके भरणे अनिवार्य आहे. ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करून थकबाकीचा त्वरित भरणा करावा आणि वीज खंडित झाल्यावर शेजाºयााकडून वीज घेण्यासारखे बेकायदेशीर प्रकार पूर्णपणे टाळावेत, अन्यथा आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच स्मार्ट मीटर धारकांनी विहित मुदतीत बिले भरून संभाव्य गैरसोय टाळावी, असे आवाहन नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले आहे.