भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर आणि सर्वसामान्य नागरिकांची होत असलेली आर्थिक पिळवणूक याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) महिला आघाडी आक्रमक झाली आहे. २ सप्टेंबर रोजी राज्यभर करण्यात आलेल्या निषेध आंदोलनाचा एक भाग म्हणून भंडारा येथे महिला आघाडीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्षा राणीताई ढेंगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून जिल्हाधिकाºयांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी ‘बस हो गई… महंगाई की मार, नही चाहिये अब ये तानाशाही सरकार!’ अशा जोरदार घोषणा देत केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात निषेधव्यक्त केला. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक बजेट कोलमडले असून, दैनंदिन गरजा भागविणे कठीण होत असल्याचा आरोप महिला आघाडीच्या पदाधिकाºयांनी केला.