गोंदियात प्रथमच आढळला दुर्मीळ युरोपियन रोलर पक्षी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया जिल्ह्याच्या समृद्ध जैवविविधतेत आणखी एका दुर्मीळ स्थलांतरित पक्ष्याची नोंद झाली आहे. युरोपियन रोलर हा पक्षी गोंदिया जिल्ह्यात प्रथमच आढळून आला असून, गोरेगाव तालुक्यातील मुर्दोली जंगल परिसरात या पक्ष्याचे दर्शन झाले आहे. वनरक्षक आरती फुले यांनी पक्षीनिरीक्षण करताना या दुर्मीळ पक्ष्याची नोंद घेतली आहे. गोंदिया जिल्ह्यात पहिल्यांदाच युरोपियन रोलरची नोंद झाल्याने पक्षीप्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. गोरेगाव तालुक्यातील मुर्दोली जंगल परिसरात या स्थलांतरित पक्ष्याचे दर्शन झाले असून, वनरक्षक आरती फुले यांनी पक्षीनिरीक्षणा दरम्यान या पक्ष्याची नोंद केली आहे. महाराष्ट्रातही हा पक्षी अत्यंत कमी प्रमाणात आढळतो.

युरोपियन रोलर हा स्थलांतरित पक्षी असून, स्थलांतराच्या काळात तो महाराष्ट्रातील काही भागात दिसून येतो. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या उपलब्ध नोंदींमध्ये नागपूर, वर्धा, सोलापूर आणियवतमाळ या भागात या पक्ष्याची नोंद झाल्याचे आढळते. त्यामुळे गोंदियातील ही नोंद पक्षीवैविध्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. गोंदिया जिल्हा म्हणजे घनदाट जंगल, तलाव, जलस्रोत आणि विविध प्रकारच्या वन्यजीवांनी समृद्ध असलेला परिसर. याच गोंदियाच्या जैवविविधतेमध्ये आता एका दुर्मीळ स्थलांतरित पक्ष्याची भर पडली आहे. युरोपियन रोलर…! गोंदिया जिल्ह्यात प्रथमच या पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे. गोरेगाव तालुक्यातील मुर्दोली जंगल परिसरात हा पक्षी आढळून आला. वनरक्षक आरती फुले या पक्षीनिरीक्षण करत असताना त्यांच्या निदर्शनास हा पक्षी आला. त्यानंतर त्याची ओळख पटवून पक्ष्याची नोंद करण्यात आली. युरोपियन रोलर हा आकर्षक रंगसंगती असलेला स्थलांतरित पक्षी आहे. भारतातील काही भागांमध्ये त्याचे दर्शन होत असले तरी महाराष्ट्रात हा पक्षी नियमितपणे दिसणाºया पक्ष्यांमध्ये मोडत नाही. त्यामुळे पक्षीनिरीक्षकांसाठी युरोपियन रोलरचे दर्शन ही विशेष बाब मानली जाते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *