बन्सीलाल लाहोटी नूतन महाराष्ट्र विद्यालयात विद्यार्थ्यांच्या नेतृत्वातून शिक्षक दिनाचा अनोखा सोहळा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शिक्षक दिन म्हणजे केवळ शिक्षकांचा सत्कार आणि औपचारिक कार्यक्रम न ठेवता, विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना वाव देत संपूर्ण शिक्षक दिनाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांनीच आयोजित करून एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला. दरवर्षी शिक्षक दिनाचा कार्यक्रम शिक्षकांच्या पुढाकाराने आयोजित केला जातो. मात्र यावर्षी मुख्याध्यापक साकुरे यांनी ‘शिक्षक दिन हा शिक्षकांनी आयोजित करण्याचा कार्यक्रम नसून, विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसाठी साजरा करण्याचा दिवस आहे,’ अशी भूमिका मांडत संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थ्यांकडे सोपविले. या आव्हानाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शालेय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून कार्यक्रमाचे नियोजन केले. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या कल्पना, सर्जनशीलता आणि नियोजनातून कार्यक्रमाची आखणी केली. शिक्षक दिनाच्या दिवशी संस्थेचे अध्यक्ष किशोर प्रधान,सचिव शशिकला प्रधान,मुख्याध्यापक डी. बी. साकुरे , पर्यवेक्षक श्री. दोनोडे, कार्यक्रमाच्या प्रमुख राठी मॅडम व सर्व शिक्षकांचे बँडच्या तालावर दिमाखदार स्वागत, औक्षण, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार तसेच विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेल्या शुभेच्छापत्रांचे सादरीकरण करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला ‘चिठ्ठी गेम’ हा विशेष आकर्षण ठरला. या उपक्रमामुळे शिक्षकांना आपल्या शिक्षक प्रवासातील जुन्या आठवणींना उजाळा देत स्वत:कडे पुन्हा एकदा पाहण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी भावपूर्ण गीते सादर केली. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी मिठाईची व्यवस्था करून शिक्षक दिनाला विद्यार्थ्यांनी प्रेमाचा गोड स्पर्श दिला. या अनोख्या उपक्रमाबद्दल बोलताना मुख्याध्यापक डी. बी. साकुरे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवला तर ते अपेक्षेपेक्षा मोठे काम करू शकतात’ या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी नेतृत्व, नियोजन, संघभावना, सर्जनशीलता आणि जबाबदारीची जाणीव यांचे दर्शन घडविले. ते पुढे म्हणाले,‘शिक्षकाची खरी कमाई पगाराची पावती नसते; विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील आदर, मनातील कृतज्ञता आणि ओठांवरील ह्यळँंल्ल‘ ङ्म४, र्र१/टंेिंह्ण हेच शिक्षकाचे खरे धन असते. विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षक दिन साजरा केला नाही, तर ‘विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवा आणि त्यांना जबाबदारी द्या’ हा शिक्षणातील महत्त्वाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला.

शालेय मंत्रिमंडळातील पदाधिकारी, कॅप्टन, उपक्रम प्रमुख तसेच कार्यक्रमामागे शांतपणे कार्यरत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अध्यक्षांनी विशेष कौतुक केले. ‘आज तुम्ही शिक्षकांचा सन्मान केला; पण खºया अर्थाने आज तुम्ही स्वत:च मोठे झालात,’ अशा शब्दांत सचिवानी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून साकारलेला हा शिक्षक दिन शाळेतील शिक्षकांसाठी अविस्मरणीय ठरला असून, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम एक आदर्श प्रयोग ठरला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *