महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या बस सवलतीसाठी आयडी कार्डाची अट शिथिल करा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे परिवहन विभागाला निवेदन

मोरेश्वर बिसने/भंडारा पत्रिका तुमसर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच वृद्ध नागरिकांना मिळणाºया प्रवास सवलतीसाठी १ सप्टेंबरपासून आयडी कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करून ही अट शिथिल करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात तुमसर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी संबंधित विभागाला निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, अनेक ज्येष्ठ व वृद्ध नागरिकांना आॅनलाइन प्रक्रिया, मोबाईल किंवा इंटरनेटचा वापर करता येत नाही. ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेक महिला व ज्येष्ठ नागरिकांकडे स्मार्टफोन अथवा इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसते. अशा परिस्थितीत केवळ आयडी कार्ड नसल्यामुळे त्यांना प्रवास सवलतीपासून वंचित ठेवणे अन्यायकारक ठरू शकते. तसेच आयडी कार्ड तयार करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, काडार्साठी आकारण्यात येणा?्या शुल्काबाबतही नागरिकांमध्ये नाराजी आहे. कार्ड तयार झाल्यानंतर आॅनलाइन पेमेंटची अट असल्यास डिजिटल सुविधा नसलेल्या नागरिकांना मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत.

यापूर्वी आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्राच्या आधारे वाहकांकडून पात्र नागरिकांना प्रवास सवलत दिली जात होती. त्यामुळे केवळ आयडी कार्डाच्या अटीमुळे गरीब, ग्रामीण आणि डिजिटल सुविधांपासून वंचित नागरिकांना सवलतीपासून दूर ठेवू नये. आयडी कार्डाची प्रक्रिया सुलभ करावी, आॅफलाइन पद्धतीनेही शुल्क स्वीकारावे आणि आधार कार्डासह वैध ओळखपत्राच्या आधारे सवलत देण्याची पर्यायी व्यवस्था कायम ठेवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. गरीब व गरजू नागरिकांच्या हिताचा विचार करून शासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी आणि आयडी काडार्ची सक्ती शिथिल करून ज्येष्ठ नागरिक, वृद्ध व महिलांना प्रवास सवलतीचा लाभ पूर्वीप्रमाणे सहज उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मेहताबसिंग ठाकुर जिल्हा सचिव यानी व्यक्त केली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *