भंडारा जिल्ह्यात बैलपोळा उत्साहात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शेतकºयांच्या जीवनाशी अतूट नाते असलेला पारंपरिक बैलपोळा सण भंडारा जिल्ह्यातील गावागावात मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. शेतकºयांनी वर्षभर शेतीच्या कामात साथ देणाºया आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांची पूजा केली. त्यामुळे ग्रामीण भागात सकाळ पासूनच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांनी आपल्या बैलांना आदल्या दिवसापासूनच सजविण्याची तयारी केली होती. बैलांना स्वच्छ अंघोळ घालून त्यांच्या शिंगांना आकर्षक रंग देण्यात आले. तसेच गळ्यात विविध प्रकारच्या माळा, घुंगरू, सजावटीच्या वस्तू आणि अंगावर रंगीबेरंगी झूल घालून सर्जाराजाला सजविण्यात आले. काही ठिकाणी बैलांच्या शिंगांना आकर्षक रंगरंगोटी करून त्यांना पारंपरिक दागिन्यांनी सजविण्यात आले. सकाळी घरातील महिला व पुरुषांनी बैलांची विधिवत पूजा केली. बैलांच्या कपाळावर कुंकू-हळद लावून औक्षण करण्यात आले. त्यानंतर त्यांना गोडधोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून खाऊ घालण्यात आला.

शेतकºयांनी आपल्या बैलांचे आभार मानत त्यांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. गावागावात पोळ्याची मिरवणूक व पारंपरिक सोहळे आयोजित करण्यात आले. सजविलेल्या बैलांना घेऊन शेतकरी पारंपरिक वेशभूषेत पोळ्याच्या ठिकाणी दाखल झाले. ढोल-ताशांच्या गजरात तसेच पारंपरिक वाद्यांच्या निनादात बैलपोळ्याचा उत्साह अधिकच वाढला. अनेक गावांमध्ये बैलांची आकर्षक सजावट नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. ग्रामीण भागातील लहान मुलांमध्येहीपोळ्याचा विशेष उत्साह दिसून आला. अनेक घरांमध्ये मातीच्या बैलांची पूजा करण्यात आली. घराघरात विविध प्रकारचे गोड पदार्थ तयार करण्यात आले. नातेवाईक व मित्रमंडळींनी एकमेकांना पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या. शेतकरी आणि बैल यांच्यातील भावनिक नाते जपणारा हा सण भंडारा जिल्ह्याच्या ग्रामीण संस्कृतीचा महत्त्वाचा भाग मानला जातो. आधुनिक शेतीमध्ये यंत्रांचा वापर वाढला असला तरी बैलांचे शेतीतील योगदान आणि ग्रामीण जीवनातील त्यांचे स्थान आजही महत्त्वाचे आहे. त्यामुळे पोळ्याच्या निमित्ताने शेतकºयांनी आपल्या सर्जाराजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. भंडारा, लाखनी, साकोली, तुमसर, मोहाडी, पवनी, लाखांदूर आणि परिसरातील विविध गावांमध्ये बैलपोळा उत्साहात साजरा झाल्याने संपूर्ण ग्रामीण भागात सणाचे वातावरण निर्माण झाले होते. परंपरा, श्रद्धा आणि शेतकरी-बैलांचे जिव्हाळ्याचे नाते यांचा सुंदर संगम बैलपोळ्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *