शासकीय तांदूळ चोरी प्रकरणाला गंभीर वळण; कृउबा सचिवाला अटक, आॅटोही जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : लाखांदूर फाट्याजवळील शासकीय धान्य गोदामातून गोरगरिबांच्या वाटपासाठी ठेवलेले ३६१ कट्टे तांदूळ, किंमत ५ लाख ४१ हजार ५०० रुपये, चोरीला गेल्याच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. तपासादरम्यान सडक अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव तथा राईस मिल संचालक संजयकुमार भैय्यालाल पुस्तोडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. साकोली येथील राकेश आगासे (३५) यालाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एमएच ३५ एजे ५१७० आणि आॅटो क्रमांक एमएच ३६ एए ३६९४ अशी वाहने जप्त केली आहेत. चोरीच्या तांदळाचा मोठा हिस्सा हस्तगत करण्यात आला आहे. तपास पुढे गेल्यास या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

शटरचे नट-बोल्ट काढून शासकीय तांदूळ लंपास

साकोली-लाखांदूर फाट्यावरील शासकीय धान्य गोदामाच्या शटरचेनट-बोल्ट काढून चोरट्यांनी गोदामात प्रवेश केला. गोरगरिबांना वाटप करण्यासाठी ठेवलेले तब्बल ३६१ कट्टे तांदूळ चोरीला गेल्याने शासकीय धान्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तपासात संजय पुस्तोडे यांचे नाव

पोलिसांनी चोरीच्या तांदळाचा माग काढताना गोंदिया जिल्ह्यातील गिरोला (हेटी) येथील रहिवासी संजयकुमार भैय्यालाल पुस्तोडे यांना ताब्यात घेतले. ते सडक अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव असून राईस मिलचे संचालकही आहेत. शासकीय तांदळाची खरेदी, साठवणूक आणि पुढील विक्रीच्या साखळीत त्यांची भूमिका काय होती,याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

 

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *