अन्नापासून कुणीही वंचित राहू नये : महेश ढवळे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : राज्यातील कोणतीही व्यक्ती किंवा गरीब कुटुंबीय अन्नापासून व धान्यापासून वंचित राहू नये, यासाठी राज्य शासनाची यंत्रणा कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी केले. राज्य अन्न आयोगाच्यावतीने भंडारा जिल्ह्याचा विशेष तीन दिवसीय दौरा आयोजित करण्यात आला असून, या दौºयाच्या दुसºया दिवशी लाखांदूर तालुक्यातील कोदामेळी येथे प्रत्यक्ष पाहणी व जनजागृती मोहीम राबवण्यात आली. दौºयादरम्यान लाखांदूर तालुक्यातील कोदामेळी येथे विशेष सभेचे आयोजन करून ‘नाथ जोगी’ या भटक्या व विमुक्त जमातीच्या नागरिकांना अन्न सुरक्षा योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. भटक्या व पारधी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या मोफत व सवलतीच्या अन्नधान्याचा लाभ पोहोचवण्यासाठी प्रशासनाने थेट त्यांच्या वस्तीवर जाऊन संवाद साधला.

या वेळी गरजू नागरिकांना नवीन शिधापत्रिकांचे (राशन कार्ड) प्रत्यक्ष वाटप करण्यात आले, तसेच नवीन शिधापत्रिका तयार करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि आॅनलाइन प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली. या महत्त्वाच्या लोककल्याणकारीदौºयात राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्यासह आयोगाचे सदस्य ईश्वर बाळबुद्धे, जिल्हा पुरवठा अधिकारी रतनलाल ठाकरे, धान्य खरेदी अधिकारी सुहास टोंग, भंडारा जिल्हा पुरवठा अधिकारी शंकर राठोड , कोचीराम कापडे निरीक्षण अधिकारी भंडारा,लाखांदूरचे तालुका पुरवठा निरीक्षक अधिकारी धिरज मेश्राम, कनिष्ठ लिपिक निहाल गणवीर, राहुल कढव, रवी उन्हाळे ,साकोली निरीक्षण अधीकारी रोशन कापसे लाखनी उपस्थित होते. यांच्यासोबतच जिल्ह्यातील सर्व पुरवठा अधिकारी आणि पुरवठा विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाला कायदेशीर अन्नधान्य मिळण्याचा अधिकार असून यात कुणालाही डावलले जाणार नाही, याची खात्री प्रशासनाकडून दिली जात आहे.धान्याची अफरातफर रोखण्यासाठी आणि प्रत्येक पात्र शिधापत्रिकाधारकाला हक्काचा कोटा मिळण्यासाठी डिजिटल प्रणाली व ई-पॉस उपकरणांच्या वापराबाबत अधिकाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत. स्थलांतरित आणि भटक्या जमातींकडे जन्माचा किंवा कायम स्वरूपी पत्त्याचा पुरावा नसतानाही त्यांना शिधापत्रिका मिळवून देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश या वेळी देण्यात आले. अन्न आयोगाच्या या दौºयामुळे भंडारा जिल्ह्यातील तळागाळातील व वंचित घटकांपर्यंत शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होणार असून, कुणीही भुकेला राहणार नाही असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करण्यात आला.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *