आरक्षणाचा निर्णय संविधानाच्या चौकटीतच : आ.परिणय फुके

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भाजपचे ओबीसी नेते तथा आमदार डॉ. परिणय फुके यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाचा मुद्दा, मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन, नव्याने आढळलेल्या जात प्रमाणपत्रांच्या नोंदी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या राजकीय हालचालींवर जोरदार टीका केली. आरक्षणाचा कोणताही निर्णय हा संविधानाच्या चौकटीत राहूनच घेतला जाऊ शकतो, असे स्पष्ट करत आ. डॉ. फुके यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे संरक्षण करण्याची भूमिका मांडली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर टीका करताना डॉ. फुके म्हणाले, ‘मनोज जरांगे हे बालहट्ट करत आहेत. जो पूर्ण होऊच शकत नाही.

संविधानाच्या बाहेर जाऊन कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी आरक्षण देता येणार नाही. हे जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी समजून घेतले पाहिजे. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार कोणत्याही केंद्र किंवा राज्य सरकारला नाही. ओबीसी आयोगालाही संविधानाच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्यावा लागेल.’ मराठा समाजाला ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून आरक्षणाचालाभ मिळत असल्याचे सांगत डॉ. फुके म्हणाले की,‘मराठा समाजाला ईडब्ल्यूएसमध्ये दहा टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यातून नोकरी आणि शिक्षणात लाभ मिळू शकतो. मात्र जरांगे पाटील आपली लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी वारंवार आंदोलन करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यापेक्षा मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचे काम केले जात आहे. कोणत्याही धमकीला कोणीही घाबरणार नाही.’

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *