घोगरा-एलोरा मार्गावर अवैध रेती भरणारे दोन टिप्पर तिरोडा पोलिसांनी केले जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : आज दिनांक १९ रोजी तिरोडा पोलीस स्टेशनचे हवालदार संजू बांन्ते शिपाई अमित गायकवाड, चालक अनिल इलमे गस्तीवर असताना त्यांना मिळालेले माहिती वरून घोगरा एलोरा मार्गावर दोन टिप्पर एका जेसीबीने अवैद्य रेती भरत असल्याचे दिसल्यावरून पोलीस आल्याचे पाहून जेसीबी चालक व एका टिपर चालकाने टिपर व जेसीबी घेऊन पळ काढला मात्र पोलिसांनी सदर टिपरचा नंबर नोंद करून त्याचा तपास केला असता सदर टिप्पर याच मार्गावर काही अंतरावर आढळून आल्याने दोन्ही टिपर ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन तिरोडा येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

तिरोडा पोलीस सूत्रांनी दिलेले माहितीनुसार आज दिनांक १९ रोजी सकाळी ९ वाजता चे दरम्यान पोलीस हवालदार संजू बान्ते, शिपाही अमित गायकवाड, वाहन चालक अनिल इलमे मुंडीकोटा परिसरात गस्तीवर असताना त्यांना मिळालेले गुप्त माहितीवरून त्यांनी घोगरा एलोरा मार्गावर गेले असता पोलिसांना पाहून एक टिपर चालक व जेसीबी चालक वाहनासह पळून गेले तर येथे असलेला टीपर क्रमांक एम एच ४० सी झेड १८१९ चालकास नाव विचारले असता त्याने आपले नाव रोशन शंखपाल वनवे २६ वर्ष रा.खैरी, तालुका तिरोडा असे सांगितले असता त्यास मालकाचे नाव विचारले असता टिपर मालक राकेश भेलावे रा. घोगरा असून त्यांचे सांगण्यावरून टिपर विना परवाना मध्ये रेती भरत असल्याचे सांगितल्यावरून टिप्पर अंदाजे किंमत २० लक्ष रुपये व सात ब्रोस रेती ४२००० हजार असा एकूण २० लक्ष ४२ हजार रुपयांचा तसेच समोर पळून गेलेल्या टिपरचा पाठलाग करून पकडलेला टिपर क्रमांक एम एच ४० सी वाय १८१९ चालक रोहित राजकुमार बांडेबुचे वय २३ रा.मोहाडी मालक विनोद सोनटक्के राहणार खापा यांचे सांगणे वरून विनापरवाना रेती भरत असल्याचे सांगितल्या वरून दोन्ही टिपर चालक व मालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ४९ नुसार गुन्हा दाखल करून दोन्ही टिप्पर रेती सह किंमत ४० लक्ष ८४ हजार जप्त करून कारवाई केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दडस पाटील करीत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *