भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : शहरालगतच्या ईरी येथील झुडपी जंगलात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री धाड टाकून जुगार खेळणाºया १२ जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत रोख रकमेसह १४ मोबाईल, दुचाकी, चारचाकी वाहन व जुगाराचे साहित्य असा तब्बल १२ लाख ४ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जुगार अड्डा चालविणाºया चौघांची नावेही चौकशीत निष्पन्न झाली असून, एकूण १९ जणांविरुद्ध गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निदेर्शानुसार एलसीबीचे पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कारवाईसाठी पेट्रोलिंग करीत असताना ईरी येथील झुडपी जंगल परिसरात काही इसम ५२ पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हार-जीतचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे मंगळवारी रात्री सुमारे ११ वाजता पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला.