भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्हा दूग्ध उत्पादक संस्थासंघाचे अध्यक्ष विलास काटेखाये यांनी १७ आॅगस्ट रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. अवघा एक वर्षाचा कालावधी पूर्ण होताच दिलेला राजीनामा नेमका कशामुळे, हा उत्सुकतेचा विषय आहे.४ आॅगस्ट २०२५ रोजी विलास काटेखाये यांची संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.