भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : समग्र शिक्षा संघर्ष समिती भंडाराच्या समग्र शिक्षा करार कर्मचारी यांना अधिसंख्य पदावर शासन सेवेत समकक्ष वेतन श्रेणीतील पद निर्मिती करून नियुक्ती देण्याचा शासन निर्णय दि.४ आॅगस्ट २०२६ ला घेण्यात आला. त्यामुळे आजचा दिवस समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाºयासाठी फक्त एका निर्णयाचा नाही, तर तब्बल ११७ दिवसांच्या त्या अथक संघर्षाची फलश्रुती आहे. यामुळे राज्यात ३ हजार २७६ कंत्राटी कर्मचाºयांच्या आयुष्यात सन्मानाचा नवा सूर्योदय झाला. तर जिल्ह्यात ६६ कंत्राटी कर्मचाºयांना सेवेच्या तब्बल २० ते २४ वर्षानंतर त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे हा विजय केवळ एका पदाचा नाही; तर एकजुटीचा, संयमाचा, संघर्षाचा आणि नि:स्वार्थ ध्येयाचा आहे. अशी भावना कंत्राटी कर्मचाºयांनी व्यक्त केली. या निर्णयामुळे साधनव्यक्ती, डेटा एन्ट्री आॅपरेटर, मीस कोआरडीर्नेटर, कनिष्ठ अभियंता, रोखपाल, सहाय्यक कार्यक्रम अधिकारि जिल्हा प्रोग्रामर, इत्यादी समग्र कर्मचाºयांना समकक्ष वेतन श्रेणीवर नियुक्तीचा लाभ होणार आहे.
कंत्राटी कर्मचाºयांना कायम सेवेत आणण्याच्या या लढ्यात प्रा.मनोहर धोंडे, ज.मो. अभ्यंकर, आ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तसेच संघर्ष समितीच्या राज्य अध्यक्षा योगिता बलाक्षे, शिवकरण गोसावी, संजय अकोले, विश्वजित गोंडाणे, पराग चाटोरीकर, सुनील दराडे, नीता देशमुख, शकुंतला दडमल यांच्या सक्षम आणि अथक प्रयत्नांमुळे हा संघर्ष यशस्वी झाला. अभ्यास समितीतील सर्व सदस्य, सर्व आमदार, सर्व शिक्षक संघटना, संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी, उपोषणकर्ते आणि राज्यभरातून खांद्याला खांदा लावून लढणाºया प्रत्येक सहकाºयानी लढ्यात महत्वाची भूमिका निभावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार, शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला. याबद्दल प्रकाश काळे, विरेद्र गौतम, दिनकर मानापुरे, राम वाडीभस्मे, प्रमोद सोनवाने, शुभ्रा कांबळे, दिप्ती ठवकर, अर्चना बेदरकर, दिपाली बोरीकर, योगेंद्र ठाकूर, विवेक बोरकर, योगिता गोस्वामी, रमेश भेंडारकर, मुरलीधर रेहपाडे, अनिल घोडीचोर, स्मिता चवरे, रामरतन भाजीपाले, वैशाली नगराळे, मंगला खोब्रागडे, उज्वला बावणकर व अन्य समग्र शिक्षा कर्मचाºयांनी आनंद व्यक्त केला आहे.