जिल्ह्यातील रस्ते, पूल व शासकीय इमारतींच्या कामांना गती देणार!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील रस्ते, पूल, शासकीय इमारती तसेच आरोग्य सुविधांच्या बांधकामांना गती देऊन प्रलंबित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले. कामांमध्ये दिरंगाई करणाºया कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही यावेळे त्यांनी दिले. भंडारा येथील शासकीय विश्रामगृहात आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे,आमदार परिणय फुके,गोंदियाचे आमदार विनोदकुमार अग्रवाल, आमदार राजु कारेमोरे, आमदार नाना पटोले, जिल्हाधिकारी सावन कुमार, नागपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी माने, कार्यकारी अभियंता अभिजित कुचेवार, गोंदिया येथील कार्यकारी अभियंता बी. डी. रामटेके, कार्यकारी अभियंता नीता ठाकरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

भंडारा जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित एकूण १,११८.०१ किलोमीटर रस्ते आहेत. यामध्ये ४१६.९७ किलोमीटर राज्यमार्ग, ६९७.०४ किलोमीटर प्रमुख जिल्हा मार्ग आणि ४ किलोमीटर प्रमुख राज्यमार्गाचा समावेश आहे.जिल्ह्यात विविध विकासकामांच्या ४८७ कामांना १,०५७.१३ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. प्रगतीपथावरील तसेच प्रस्तावित कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक अतिरिक्त निधीची मागणी बैठकीत करण्यात आली. जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या पुलांची पाहणी करण्यात आली आहे. या पाहणीत सध्या कोणताही पूल धोकादायक अथवा पुर्नबांधणीसाठी आवश्यक नसल्याचे आढाव्यात स्पष्ट करण्यात आले. बैठकीत आरोग्य विभागाशी संबंधित बांधकामांचाही आढावा घेण्यात आला. भंडारा येथील १०० खाटांच्या स्त्री रुग्णालयाच्या दुसºया टप्प्याचे २५.२५ कोटी रुपयांचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. तसेच साकोली उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता ५० वरून १०० खाटांपर्यंतवाढविण्याचे ६१.२३ कोटी रुपयांचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे.

नाबार्डअंतर्गत मंजूर २९ गोदाम बांधकामांपैकी १६ कामे पूर्ण करून संबंधितांकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. मंजूर १५२ तलाठी कार्यालयांपैकी ४६ कार्यालयांची कामे पूर्ण झाली असून इतर कामे प्रगतीपथावर आहेत. जांब-मोहाडी-रोहा-मुंढरी रस्त्यावरील वैनगंगा नदीवरील मोठा पूलाचे काम प्रगती पथावर आहे.असून लाखांदूर प्रशासकीय इमारत, राज्य उत्पादन शुल्क विभागाची प्रशासकीय इमारत, भंडारा येथील व्हीआयपी विश्रामगृहाचे विस्तारीकरण तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *