जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांनी पुकारले राज्यव्यापी आंदोलन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील शिक्ष्- ाक व शिक्षकेतर कर्मचाºयांना जुनी पेन्शन लागू करणे, शिक्षक पात्रता परीक्षा रद्द करावे. तसेच प्रलंबित मागण्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, जिल्हाकार्यवा राजेश धुर्वे यांचे नेतृत्वात गुरुवारी दुपारी ३ ते ५ या कालावधीत माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी धरणे आंदोलन पुकारले. यात विदर्भ खाजगी प्राथमिक शिक्षक संघानेही पाठिंबा दिला आहे. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त सर्व शिक्षककर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना द्या. २०१० पूर्वी नियुक्त १ ते ८ शिक्षकांना टीईटीतून सूट द्यावे. वेतन आयोग, घरभाडे, वैद्यकीय सवलतीची थकबाकी तातडीने द्या.

जिल्ह्यातील शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर रिक्तपदे तात्काळ भरा. विनाअनुदानित शाळांना टप्पा अनुदान मंजूर करा. शिक्षकांना निवडणूक, जनगणना कामातून मुक्त करा. शिक्षकेतर कर्मचाºयांची पदोन्नतीवरील बंदी तातडीने उठवावे. विनाअनुदानित शाळांना अनुदान द्यावे. याशिवाय इतर मागण्याचा समावेश होता. जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, जिल्हार्यावाह राजेश धुर्वे, टेकचंद मारबते, धीरज बांते, चंद्रशेखर रहांगडाले, भीमराव मेश्राम, पंजाब राठोड, सुधाकर धाडसे, जागेश्वर मेश्राम, संजय पडोळे, भाऊराव वंजारी, शालिकराम खोब्रागडे, गौतम खोब्रागडे, प्रकाश मते, मन्साराम जीभकाटे, भीष्म टेंभुर्णे, जयदेव बोकडे, शमशाद सय्यद, अर्चना भोयर, कांता कामथे, प्रमोद सेलोकर, महेंद्र बडवाईक, हर्षल कोट्टेवर, प्रभाकर मेश्राम, अनिल काप, रामरतन केवट, गणेश माकडे, सोशीत बुद्धे, अशोक गिरी, इत्यादी जिल्ह्यातील खाजगी, स्थानिक स्वराज्य संस्था, आश्रम शाळांमधील शिक्षक मोठ्या संख्येने होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *