दहीहंडी उत्सवाला गालबोट:पायºयांचा स्लॅब कोसळून २१ जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- जिल्ह्यातील आमगाव येथे अष्टविनायक दहीहंडी उत्सवादरम्यान मोठा अपघात घडला. दहीहंडी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक पायºयांच्या स्लॅबवर उभे असताना अचानक स्लॅब कोसळल्याने एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत तब्बल २१ जण जखमी झाले असून, त्यापैकी सहा जण गंभीर जखमी आहेत. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी गोंदिया जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आमगाव येथे अष्टविनायक दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात सुरू होता. उत्सव पाहण्यासाठी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दहीहंडीचा सोहळा पाहण्यासाठी अनेक नागरिक आसपासच्या उंच ठिकाणी तसेच पायºयांच्या स्लॅबवर उभे होते.

याचदरम्यान अचानक पायºयांचा स्लॅब भराभर कोसळला. स्लॅबवर उभे असलेले नागरिक खाली कोसळल्याने घटनास्थळी एकच आरडा ओरड सुरू झाली. अपघातानंतर नागरिक आणि आयोजकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी आमगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर १६ जखमींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर सहा जण गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोंदिया जिल्हा रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले आहे. गंभीर जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या गर्दीच्या कार्यक्रमात नागरिकांना उंच ठिकाणी जाण्यास परवानगी देताना सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाले का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या दुर्घटनेनंतर उत्सवाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था आणि गर्दी नियंत्रणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *