भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पाण्याअभावी भंडारा तालुक्यातील धान पिके करपण्याच्या मार्गावर असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करताना सरसकट १०० टक्के नुकसान दाखवून शेतकºयांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदना नुसार, भंडारा तालुक्यात मोठ्या प्रमाणात धानाचे पीक घेण्यात आले आहे. सुरुवातीच्या काळात काही भागातील शेतकºयांना पेंच प्रकल्पाचे पाणी रोवणीसाठी उपलब्ध झाले होते. मात्र, आता प्रकल्पातील पाण्याची पातळी कमी झाल्याने शेतीसाठी आवश्यक पाणी मिळणे कठीण झाले आहे. परिणामी धानाची पिके पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर आहेत. तसेच ज्या भागात लिफ्ट सिंचनाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो त्या ठिकाणीही वेळेवर पाणी उपलब्ध झाले नसल्याने धानाच्या उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत