प्रवेश नसतानाही नावासमोर ‘एनआयटीएन’ खासगी कोचिंगचा गोरखधंदा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : कोचिंग क्लासेसची होर्डिंगबाजी हा गुणवत्तापूर्ण शिक्षणाऐवजी केवळ व्यवसाय आणि नफा कमवण्याचा गोरखधंधा बनत असल्याचे आजच्या घडीला सर्वत्र दिसून येत आहे. गोंदियासारख्या शहरात तर खासगी कोंचिग क्लासेसच्या होर्डींगमुळे शहराचे विद्रुपीकरण झालेले असतांना नगरपरिषद व जिल्हाधिकारी कार्यालय आधंळे व बहिरे होऊन बसलेले आहे. सध्या गोंदिया शहरात एनआयटी (ठकळ) किंवा आयआयटी (ककळ) च्या नावाचा वापर करून अनेक कोचिंग क्लासेस पालक व विद्यार्थ्यांची फसवणूक करत असल्याचा प्रकार समोर येत आहे. जेईईचा नुकताच निकाल जाहिर झालेला आहे, परंतु त्यात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे एनआयटीएन झाले असे नाही, मात्र गोंदिया शहरातील कॅरीयर एक्सझोन या खासगी कोचिंग क्लासेसच्यावतीने शहरातच नव्हे जिल्ह्यात लावलेल्या होर्डीगमध्ये ४३ विद्यार्थी एनआयटीएन झाल्याच्या उल्लेख करीत विद्यार्थ्यासह पालकांची दिशाभूल करुन आपल्या खासगी कोचिंगचा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले.

मागच्यावर्षी सुध्दा त्यांनी अशाच प्रकारचा एक प्रकार केलेला होता, त्यात अखिल भारतीय ८२ वा रँंक दाखवलेल्या मुलीला दिल्ली, भोपाल, रायबरेली सारख्या आर्युविज्ञान संस्थेत प्रवेश मिळायला हवा होता, मात्र नागपूरच्या एएम्समध्ये मिळाल्याने कुठेतरी दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रकार झालेला होता. याप्रकरणात पालकांचा व नागरिकांनी गोंधळ केल्याने शहरातील होर्डींग व सोशल मिडिया प्लटफार्मवरुन ते सर्व हटवून पोलिसांकडे क्षमायाचना सुध्दा करण्यात आली होती. विशेष म्हणजे शहरात जागोजागी हे होर्डींग लागलेले असून नगरपरिषदेच्यावतीने बहुतांश होर्डींगची परवानगीच घेतली नसल्याचे होर्डींगवरुन बघावयास मिळाले. एकीकडे विजेचे खांब व शासकीय मालमत्तेवर होर्डींग लावणे गुन्हा असताना कॅरीयर झोन कोचिंग क्लासेला मुख्याधिकारी व पोलिसांनी जणू परवानाच दिला की काय? अशा पध्दतीने होर्डींग लावूनशहराच्या विदुप्रीकरणासोबतच १० वीत असलेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना भ्रामक जाहिरातबाजीतून प्रभावित करण्याचे काम करण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हे क्लासेस ‘१००% निकाल’ किंवा ‘एनआयटीन शिक्षक’ असे खोटे दावे करून पालकांकडून मोठी फी उकळतात आणि प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची दिशाभूल करीत असल्याचे रिझल्टवरून समजते.

एनआयटीन (ठकळ) किंवा तत्सम स्पर्धा परीक्षांच्या कोचिंग क्लासेसमधील गोरखधंदा हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा एक मोठा व्यवसाय बनला आहे. यामध्ये भरमसाठ फी, बनावट निकाल, हुशार विद्यार्थ्यांची जाहिरातबाजी आणि अप्रशिक्षित शिक्षकाकंडून शिक्षण यांसारख्या बाबींचा समावेश आहे. अनेक कोचिंगक्लासेस जाहिरातींमध्ये १००% निकालाचे दावे करतात. यामध्ये एकाच विद्यार्थ्याचा फोटो अनेक क्लासेसचे होर्डिंग्जवर दाखवून खोटा जनसंपर्क केला जातो. आकर्षक बॅनर आणि होर्डिंग्ज वापरून, यशस्वी विद्यार्थ्यांचे फोटो लावून (जे अनेकदा खरे नसतात) विद्यार्थ्यांना आकर्षित करुन फसविण्याच्या प्रकारही वाढलेला आहे. अशाच एका प्रकरणात गोंदियातील कॅरीयर झोन कोचिंग संस्थेच्यावतीने शहरात ४३ विद्यार्थी एनआयटीएन झाल्याचा उल्लेख असलेले होर्डींग लावले आहे, ज्यामध्ये २७ विद्यार्थ्यांचे फोटो नाव टाकले गेलेत.

विशेष म्हणजे अभियात्रिंकी शाखेत आयआयटी प्रथम स्थान असते, त्यानंतर एनआयटी, ट्रिपल आयटीला प्रवेश मिळतो. यानंतर जे जेईई उत्तीर्ण विद्यार्थी आहेत ते अभियांत्रिकीच्या विविध शाखेत प्रवेश घेतात. मात्र एनआयटी नंतर ट्रिपल आयआयटी असल्यानंतरही होर्डींगबाजीत मात्र एनआयटीआधी ट्रिपल आयआयटी घालून पालकांची व विद्यार्थींची दिशाभूल केली जात असल्याचे दिसून येत आहे. कॅरीयर एक्सझोनच्या सोशल मिडियावर आजही असे अनेक प्रकार बघावयास मिळतात. जेव्हा या होर्डींगमधील विद्यार्थी कुठल्या एनआयटी व आयआयटीमध्ये प्रवेशास पात्र ठरले यासंदर्भात विचारणा करण्याकरीता कॅरियर झोनचे संचालक रोहीत झा यांची भेट घेतली असता त्यांनी होर्डींगमध्ये लावलेल्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रिका पालक किंवा विद्यार्थ्यांकडून घेण्यास सांगत आपण देऊ शकत नसल्याचे सांगितले. तसेच जेईईनीट चा निकाल जाहिर झाला असून आॅगस्ट सप्टेंबरमध्ये या विद्यार्थ्यांना एनआयटी व आयआयटीमध्ये प्रवेश मिळून प्रक्रिया पुर्ण होईल असे सागंत होर्डींगवर एनआयटीन जे लिहिले गेले ते चुकीचे असल्याचे स्वत:चाच्या माहितीमधून सांगितले. याउलट त्यांनी देशात २ लाखाच्या जवळपास जागा असल्याचा उल्लेख करीत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा की देशपातळीवर एकुण आयआयटी, एनआयटी व ट्रिपल आयआयटीच्या ५२६२५ जागा असल्याचे पडताळणीत समोर आले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *