प्रेयसीची प्रकृती गंभीर, तरुणाच पलायन २१ वर्षीय तरुणीचा मृत्य

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : प्रेमसंबंध असलेल्या तरुणीची अचानक प्रकृती खालावल्यानंतर तिला वैद्यकीय मदत मिळवून देण्याऐवजी घटनास्थळी एकटं सोडून तरुणानं पलायन केल्याची घटना सावकारटोली बसस्थानक परिसरात रविवारी (३० आॅगस्ट) घडली. या घटनेत धामणगाव येथील २१ वर्षीय तरुणीचा हिचा मृत्यू झाला. याप्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिसांनी जागेश्वर ऊर्फ सोनू हेमराज पटले (२९), रा. धामणगाव, याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणी आणि जागेश्वर यांच्यात प्रेमसंबंध होते. घटनेच्या दिवशी दोघेही सावकारटोली परिसरात एकत्र होते. यावेळी तरुणीची प्रकृती अचानक खालावली. तिला भोवळ येत होती. तसेच तिला वाहनात बसणं आणि व्यवस्थित बोलणंही शक्य होत नसल्याचं तक्रारीत नमूद आहे. प्रकृती गंभीर असतानाही तिला तातडीने रुग्णालयात न नेता आरोपीनं घटनास्थळीच सोडल्याचा आरोप आहे. तरुणीनं विश्वासानं आपला मोबाइल फोन आरोपीकडे ठेवला होता. मोबाइल स्वत:कडे असतानाही आरोपीनं तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली नाही आणि घटनास्थळावरून निघून गेल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

रम्यान, अज्ञाताकडून तरुणीची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाल्यानंतर तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. संकटाच्या वेळी तिला वैद्यकीय मदत न देता एकटे का सोडण्यात आले, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक वर्षा नेताम यांच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलिसांनी जागेश्वर ऊर्फ सोनू हेमराज पटले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर तिच्या कुटुंबीयांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, संकटाच्या प्रसंगी मदतीचा हात देण्याऐवजी तिला एकटे का सोडण्यात आले, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वीरेंद्र भोसले तपास करीत आहेत. घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि आरोपीची भूमिका तपासली जात असून, आरोपांची सत्यता तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *