भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : बँक आॅफ इंडियाचा १२१ वा स्थापना दिवस आज विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भंडारा जिल्हाधिकारी सावन कुमार, बँक आॅफ इंडियाचे मुख्य प्रबंधक राम राजेंद्र मणी आणि उद्योगपती पंकज शारदा उपस्थित होते. मान्यवरांनी ग्राहक व बँकेच्या अधिकारी-कर्मचाºयांसोबत केक कापून बँकेचा १२१ वा स्थापना दिवस साजरा केला. यावेळी शाखा प्रबंधक राम राजेंद्र मणी यांनी जिल्हाधिकारी सावन कुमार यांचे रोप भेट देऊन स्वागत केले. अण्णा ठाकरे यांच्या हस्ते उद्योगपती पंकज शारदा यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी बँक आॅफ इंडियाला १२१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा, यासाठी पीएमईजीपी, सीएमईजीपी आदी योजनांमध्ये अधिकाधिक कर्ज वितरण करण्याचे आवाहन केले.
ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेत विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून घरपोच बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यावरही त्यांनी भर दिला. यावेळी उपस्थित ज्येष्ठ महिला ग्राहकांच्या हस्ते केक कापण्यात आला. कार्यक्रमानिमित्त उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी वरिष्ठ प्रबंधक पूर्णिमा सिंह, रुची वासनिक, आश्विन सेंडें, बनसोडे, रवि तोमर, अभिषेक, नेहा काजल, अमित, केशव, आकाश कुकडे यांच्यासह बँकेचे अधिकारी-कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते. मुख्य प्रबंधक राम राजेंद्र मणी यांनी सांगितले की, बँक आॅफ इंडियाच्या १२१ व्या स्थापना दिनानिमित्त बँकेत येणाºया सर्व ग्राहकांना मिठाईचे वाटप करण्यात आले.