बळीराजाच्या कष्टांना सलाम; शारदा विद्यालयात पोळ्याचा उत्साह

प्रतिनिधी/भंडारा पत्रिका तुमसर : ‘मातीशी नाते जपा, बळीराजाच्या कष्टांची जाणीव ठेवा आणि संस्कृतीचा वारसा पुढे न्या,’ या संदेशासह शारदा विद्यालय, बजाज नगर येथे पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. नंदीबैलांच्या प्रतिकृती, आकर्षक तोरणे, विविध भारतीय वेशभूषा आणि पारंपरिक लोकपरंपरांनी विद्यालयाचा परिसर अक्षरश: गजबजून गेला. प्राचार्य राहुल डोंगरे यांच्या हस्ते नंदीपूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना त्यांनी ‘बळीराजा त्रस्त आणि भांडवलदार मस्त अशी परिस्थिती नको; शेतकरी सुखी तर देश सुखी,’ असा संवेदनशील सामाजिक संदेश दिला. ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविताना प्राचार्य राहूल डोंगरे यांनी विद्यार्थ्यांसमोर पारंपरिक झडत्या सादर केल्या. ‘एक नमन गौरा-पार्वती, हर बोला हर, हर हर महादेव!’ या जयघोषाने परिसर भक्तिमय आणि आनंदमय झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय व सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख प्रीती भोयर यांच्यासह श्रीराम शेंडे, संजयकुमार बावनकर, नितुवर्षा मुकुर्णे, अशोक खंगार, सारिका भोयर, अंकलेश तिजारे, सुकांक्षा भुरे, बेनिता रंगारी, श्रेया उरकुडे, योगिता चोपकर, नेहा बारई, किरण रामटेके, निशा मते, नारायण मोहनकर, दिपक बालपांडे, उषा दाते, कल्पना मानकर, झनकेश्वरी सोनवाणे, अर्चना दमाहे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवृंदाने परिश्रम घेतले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *