बाजारपेठेतील नवीन व्यावसायिक गाळे पूर्वीच्या व्यापाºयांना सवलतीच्या दरात अथवा प्राधान्याने द्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : नगर परिषद पवनीच्या बाजारपेठ परिसरातील लिज धारक व अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाºया स्थायिक व्यापाºयांच्या जागा सुमारे दीड वर्षापूर्वी खाली करून घेण्यात आल्या होत्या. या जागेवर नगर परिषदेमार्फत नवीन व्यावसायिक गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले असून, बांधकाम पूर्ण झाले आहे. तसेच सदर व्यावसायिक संकुलाचे उद्घाटनही झालेले आहे. विकासकामासाठी संबंधित व्यापाºयांनी आपल्या व्यवसायाच्या जागा खाली करून नगर परिषदेला सहकार्य केले. त्यामुळे ज्या व्यापाºयांची जागा खाली करून त्याच ठिकाणी किंवा परिसरात नवीन व्यावसायिक गाळे उभारण्यात आले आहेत, त्या व्यापाºयांच्या हिताचा विचार करून त्यांना गाळे वाटपात प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषद पवनीने नवीन व्यावसायिक गाळे संबंधित पूर्वीच्या लिजधारक व स्थायिक व्यापाºयांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावेत अथवा गाळे वाटप करताना त्यांना प्रथम प्राधान्यक्रम द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात नगराध्यक्षा मॅडम व मुख्याधिकारी, नगर परिषद पवनी यांना निवेदन देण्यात आले आहे. संबंधित व्यापाºयांनी दीर्घकाळ व्यवसाय करून परिसराच्या आर्थिक विकासात योगदान दिले असून, विकासकामासाठी त्यांनी जागा खाली करून दिल्यामुळे त्यांना पुन्हा व्यवसाय उभारण्यासाठी योग्य संधी मिळणे हा न्याय्य व मानवी दृष्टिकोन असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. नगर परिषद प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून संबंधित व्यापाºयांना प्राधान्याने गाळे उपलब्ध करून द्यावेत आणि त्याबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी व्यापारी संघ पवनी यांनी केली आहे. निवेदन देताना व्यापारी असोसिएशन पवनीचे पदाधिकारी देवराज बावनकर, दत्तू मुनरतीवार, मोहन नंदरकर, मच्छिंद्र हटवार, विजय पाटील, बालू इनकने, अरविंद तांडेकर, राजू चापेगडीकर, विनोद खडगी, राहुल मोहाडीकर, चंदू बावनकर आदी व्यापारी उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *