भंडारा जिल्ह्यात विविध घटनांत पाच जणांचा मृत्यू

अपघात, विषप्राशन, विजेचा धक्का व आत्महत्यांच्या घटनांनी खळबळ; पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद

 

भंडारा : जिल्ह्यातील भंडारा, वरठी आणि साकोली पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या विविध घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये अपघातातील गंभीर दुखापतीमुळे मृत्यू, विषप्राशन, विजेचा धक्का, रस्ते अपघात तसेच गळफास घेण्याच्या घटनांचा समावेश आहे. संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

अपघातातील जखमीचा उपचारदरम्यान मृत्यू

पवनी तालुक्यातील शिवनाळा येथील मुरलीधर रामराव कोसेकर (वय ५०) यांचा अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारदरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, पवनी येथे दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, भंडारा येथे हलविण्यात आले.

रुग्णालयात आकस्मिक विभागात डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. याबाबतच्या वैद्यकीय मेमोवरून भंडारा पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अन्वेये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार प्रल्हाद ढोरे करीत आहेत.

विषप्राशन केल्याने ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू

वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेहरू बोर्ड, वरठी येथील कुंदा कृष्णराव साठवणे (वय ६५) यांचा विषप्राशनामुळे मृत्यू झाला. विषप्राशन केल्यानंतर त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, भंडारा येथील आकस्मिक विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

प्राथमिक नोंद भंडारा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. घटनास्थळ वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने संबंधित कागदपत्रे वरठी पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार पोलिस नाईक लोकफेस शिंगाडे यांच्या अहवालावरून वरठी पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक १९/२०२६, कलम १९४ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अन्वेये नोंद करण्यात आली. पुढील तपास महिला पोलीस हवालदार अर्चना साठवणे करीत आहेत.

विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

साकोली तालुक्यातील बामणीवाडा येथील विष्णू आनंदराव कोल्हे (वय अंदाजे ३३) यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ४ ऑक्टोबरच्या दुपारी ४ वाजल्यापासून ५ ऑक्टोबरच्या सकाळी ११ वाजेपर्यंतच्या कालावधीत गोरगाव श्मशानभूमीपासून पश्चिमेकडे सुमारे एक किलोमीटर अंतरावर ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतातील विद्युत खांबाता आधार देण्यासाठी असलेली तार कापून खांबावर चडून वरचे नट-बोल्ट काढण्याचा प्रयत्न करत असताना विष्णू कोहळे यांच्या डोक्याला मुख्य विद्युत वाहिनीची तार लागला. त्यांना जोरदार विजेचा धक्का बसल्याने ते खाली पडले. घटनास्थल्य पाणी व चिखल असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले.

याप्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक ६६/२०२६, कलम १९४ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अन्वेये नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार देवेंद्र खडसे करीत आहेत.

मोटरसायकल घसरल्याने जखमी वृद्धाचा उपचारदरम्यान मृत्यू

साकोली तालुक्यातील बडद येथील केवळराम राघो देशकर (वय ६१) यांचा मोटरसायकल अपघातानंतर उपचारदरम्यान मृत्यू झाला. ९ सप्टेंबर रोजी सायंकार्ये साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते मुलासोबत मोटरसायकलने कुंभारगाव गाकडे जात होते. talaवाजजवळ अचानक मोटरसायकलचे संतुलन बिघडल्याने ती घसरली. यामध्ये दोन्ही खाली पडले. अपघातात केवळराम देशकर यांच्या डोक्याला गंभीर मुका मार लागला, तसेच हात-पायला दुखापत झाली. त्यांना सुरुवातीला साकोलीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, नंतर भंडारा येथील रुग्णालयातून पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले.

उपचार सुरू असताना १३ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरुवातीला अजनी पोलीस ठाणे, नागपूर येथे मर्ग नोंदविण्यात आली होती. पुढील कागदपत्रे साकोली पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने साकोली पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक ६७/२०२६, कलम १९४ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अन्वेये नोंद करण्यात आली.

गळफास घेतलेल्या व्यक्तीचा उपचारदरम्यान मृत्यू

साकोली तालुक्यातील सागनडी येथील सुरेश शंकर कराडे (वय ५७) यांनी व्यवसायात नुकसान झाल्याच्या चिंतून गळफास घेतल्याची घटना घडली होती. ते हंगामा माल विक्रीचा व्यवसाय करीत होते. व्यवसाय व्यवस्थित न चालल्याने तसेच झालेल्या नुकसानेमुळे ते चिंतित असल्याचे सांगण्यात आता होते. त्यांना रक्तदाबाचा आजारही होता. १६ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजता त्यांनी राहत्या घर्यातील बाथरुममध्ये लाकडी बतलीला साडीच्या विणलेल्या दोरीने गळफास घेतला. कुटुंबीयांच्या निदर्शनास ही बाब आलंनतर त्यांनी इतरांच्या मदतीने त्यांना खाली उतरवले. प्राथमिक प्रयत्नंतर श्वास सुरू झाल्याने त्यांना सासनडी येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले.

उपचारादरम्यान १९ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. याबाबतच्या सुरुवातीला अजनी पोलीस ठाणे, नागपूर येथे मर्ग नोंदविण्यात आली होती. संबंधित कागदपत्रे साकोली पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर साकोली पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक ६८/२०२६, कलम १९४ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अन्वेये नोंद करण्यात आली. पुढील तपास महिला पोलीस हवालदार प्रिया बावणे करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *