मतदारांनी प्रारुप यादीत नाव तपासून आपल्या तक्रारी/दावे वेळेत सादर करावेत-जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

भंडारा : भारत निवडणूक आयोगाच्या (ECI) निर्देशानुसार भंडारा जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम – २०२६ अंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी आज दिनांक ३१ August २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अंतिम मंजूर मतदान केंद्र भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यात एकूण ११६१ मतदान केंद्रांना अंतिम मंजुरी दिली आहे (०६ केंद्रें विलीन करण्यात आली आहेत). मतदान केंद्रांची संपूर्ण यादी bhandara.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

दावे व हरकतींचा कालावधी: मतदार आपले दावे व हरकती ३१.०८.२०२६ ते ३०.०९.२०२६ या कालावधीत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी (ERO) किंवा BLO यांच्याकडे सादर करू शकतात.
दावे, हरकती व अपिलाबाबत तरतूद
दावे व हरकतीवरील निर्णय: प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीच्या कालावधीत प्राप्त झालेल्या दाव्यांवर व हरकतींवर मतदार नोंदणी अधिकारी (ERO) चौकशी करून कायदेशीर निर्णय घेतील.

अपिलाचा अधिकार (Right to Appeal): लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५० च्या कलम २४ अंतर्गत, एफह यांच्या निर्णयाने बाधित झालेल्या कोणत्याही नागरिकाला अथवा मतदाराला अपील दाखल करण्याचा पूर्ण अधिकार आहे.

प्रथम अपील (1 St. Appeal – Section 24a) प्राधिकारी: मतदार नोंदणी अधिकाऱ्याच्या (ERO) निर्णयाविरोधात मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी (DEO), भंडारा यांच्याकडे

प्रथम अपील दाखल करता येईल. मुदत: ERO यांच्या निर्णयाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत प्रथम अपील सादर करणे बंधनकारक आहे. द्वितीय अपील (2nd Appeal – Section 24b): प्राधिकारी: प्रथम अपील अधिकाऱ्याच्या (जिल्हाधिकारी) निर्णयावर समाधान न झाल्यास अथवा त्याविरोधात तक्रार असल्यास मा. मुख्य निवडणूक अधिकारी (CEO), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे द्वितीय अपील दाखल करता येईल. मुदत: प्रथम अपिलाच्या निर्णयाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत द्वितीय अपील दाखल करणे आवश्यक राहील. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी प्रारूप यादीत नाव तपासून आपल्या तक्रारी/दावे वेळेत सादर करावेत; असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सावनकुमार यांनी कळवले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *