मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणानंतर मैदान शुद्धीकरण … अनुसूचित जाती कॉंग्रेसचा संताप

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हलद्वानी येथील भाषणानंतर मैदानाचे शुद्धीकरण केल्याच्या कधीत जातीयवादी कृतीचे पडसाद भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे उमटले .काँग्रेसच्या अनुसूचित जातीशील च्या पुढाकाराने दि.०४ सप्टेंबर ला जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आले . देशाने स्वातंत्र्य समता व बंधुत्व तत्त्वावर आधारित संविधान स्वीकारल्यानंतरही या देशांमध्ये शूद्र अतिशुद्र भेदभाव पाळला जाणे हे देशाच्या एकात्मतेला संविधानाला आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्रभावनेला ठेच पोहोचवणारी असून हा अति संवेदनशील राष्ट्रद्रोह आहे असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष मनोज बनसोडे यांनी केले.

काँग्रेसने मल्लिकार्जुन खरगे या अनुसूचित जातीच्या नेत्याला राष्ट्रीय अध्यक्ष बनवून धर्मनिरपेक्ष भावनेला चालना दिले हा देशाचा खूप मोठा गौरव आहे मात्र अशा जातीयवादी संघटना व कार्यकर्त्या जोशीवर कारवाई होणे गरजेचे आहे करिता सदर जातीयवादी संघटना व कार्यकर्त्यावर राष्ट्रध्वाचा व अनुसूचित जाती जनजाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली .या मागणीची निवेदन जिल्हाधिकारी यांचे मार्फत महामहीम राष्ट्रपती दिल्ली यांना पाठविण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष मनोज बागडे महाराष्ट्र प्रदेश ,सचिव सुरेश मेश्राम,जिल्हाध्यक्ष मनोज बन्सोड, माजी सभापती विकास राऊत ,माजी सभापती मदन रामटेके ,डॉ. प्रवीण फुलकर ,सुदेश वैद्य ,अवनत राऊत, लखनलाल चौरे ,रामकृष्ण रामटेके , संजीत श्राद्धे ,अजय गौरेकर शिव बोरकर ,विनोद डोंगरे,उमेश राऊत व कार्यकर्ते उपस्थित होते .

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *