महामंडळाच्या पत्राने लाडक्या बहिणींच्या डोळ्यांत अश्रू!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- नुकताच राखीचा सन संपन्न झाला असून लाडक्या बहिणी आपल्या भावाला पर्यायाने माहेराला जाण्याच्या तयारीत असलेल्या लाडक्या बहिणींना एस. टी. प्रवासात एन. सी. एम. सी. कार्ड नसल्यामुळे पूर्ण तिकीट भरावे लागल्याने लाडक्या बहिणींचे बजेट कोलमडल्याने त्यांच्या डोळ्यात ऐन रक्षाबंधनाच्या सनासुदीच्या काळात अश्रू आल्याने लाडक्या बहिणीत संतापाचे वातावरण पसरले आहे. एस टी महामंडळाने एन सी एम सी कार्ड १ सप्टेंबर पासून वापराचे सक्ती केली आहे. आता मात्र लाडक्या बहिणींनी आताच सक्ती करायची होती काय असा प्रश्न केला आहे. यासबंधी अधिक माहिती मिळाली असता रा.प. महामंडळाद्वारे विविध सामाजिक घटकांना शासन निर्देशानुसार सवलतधारी तसेच विनासवलतधारी प्रवाशांना एन. सी. एम. सी. कार्ड देण्यात येत आहे.

सदरएन सी एम सी कार्ड नोंदणीकरण व वितरणाकरिता मे. ईबिक्स टेक्नॉलॉजिस लि. यांचेद्वारे रा.प. आगार, बसस्थानके तसेच आगार हद्दीबाहेर अधिकृत एजंटची नियुक्ती करण्यात आली आहे. सद्यस्थितीत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक व महिला यांचे एन. सी. एम. सी. कार्ड नोंदणीकरण व वितरण कार्यवाही सुरु असुन, टप्प्याटप्प्याने इतर सवलतधारी प्रवाशांना एन सी एम सी कार्ड नोंदणीकरण व वितरण कार्यवाही सुरु करण्यात येत आहे. रा. प. महामंडळाद्वारे देण्यात आलेले एन सी एम सी कार्ड ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांनादि.०१ सप्टेंबर २०२६ पासुन अनिवार्य करण्यात येत आहे. दि.०१ सप्टेंबर २०२६ पासुन ज्येष्ठ नागरिक व महिला लाभार्थ्यांना सवलतीचे तिकीट एन. सी. एम. सी. कार्ड मधुनच वितरीत करण्यात यावे. तसेच रा.प. वाहकांनी एन. सी. एम. सी. कार्डचे रिचार्ज देखील करावयाचे आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *