मुंबई : राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी दुर्घटना घडल्या आहे. राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली.मुंबई, कोकणासह पुणे, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे थैमान सुरू असून, अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती उद्भवली आहे. काही ठिकाणी दरडी कोसळून जीवित हानी झाली आहे. अतिमुसळधार पावसाचा अधिवेशनाला फटका बसला असून, विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे १३ जणांचा मृत्यू