महेश अग्रवाल यांची नागपूर शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : नागपूर शिक्षण मंडळाच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ज्येष्ठ शिक्षणप्रेमी, उद्योजक आणि समाजसेवक महेश अग्रवाल यांची सर्वानुमते मंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. महेश अग्रवाल यांच्या दीर्घ अनुभवावर, प्रभावी नेतृत्वक्षमतेवर आणि संस्थेबद्दलच्या समर्पित कार्यावर विश्वास व्यक्त करत व्यवस्थापन समितीने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर शिक्षण मंडळ शैक्षणिक क्षेत्रात नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास समितीने व्यक्त केला. महेश अग्रवाल हे गेली ४० वर्षे नागपूर शिक्षण मंडळाचे दाता सदस्य असून ते तीन कार्यकाळ व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी बी.जी.एल. आणि एम.कॉम. पर्यंत शिक्षण घेतले असून विद्यार्थी जीवनात राष्ट्रीय विद्यार्थी संघ (एनएसयूआय) चे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

सध्या ते अग्रवाल ज्युनिअर कॉलेजचे अध्यक्ष, आरएसजीके अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त तसेच विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनशी संलग्न आहेत. याशिवाय ते केअर हॉस्पिटलचे संस्थापक संचालक, श्री कृष्ण गौशाळा, तुमसरचे उपाध्यक्ष, तसेच विदर्भ क्रिकेट असोसिएशन, सी.पी. क्लब आणि इस्कॉन सोसायटीचे सदस्य आहेत. व्यावसायिक क्षेत्रातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असून ते कोळसा, वीज आणि सिमेंट उद्योगाशी संबंधित आहेत. तसेच वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (हउछ) च्या संचालक मंडळावरही त्यांनी अनेक वर्षे उल्लेखनीय सेवा बजावली आहे. या नियुक्तीबद्दल शिक्षण, सामाजिक, औद्योगिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी महेश अग्रवाल यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नागपूर शिक्षण मंडळानेही त्यांच्या नेतृत्वाखाली संस्था अधिक प्रगती करेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *