मांदेड येथे शॉर्टसर्किटमुळे राहत्या घराला भीषण आग

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील मांदेड येथे आज बुधवारी (१२ आॅगस्ट) सकाळी सुमारे ९.३० वाजताच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे एका राहत्या घराला भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, कपडे तसेच जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याने नाकतोडे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रत्नाबाई रमेश नाकतोडे वय (६०) यांच्या राहत्या घराला अचानक आग लागली. घरातून धूर व आग येत असल्याचे लक्षात येताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आग विझविण्यापूर्वी घरातील अनेक महत्त्वाचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

घटना घडली त्यावेळी रत्नाबाई यांचा मुलगा सचिन नाकतोडे हे आपल्या आई रत्नाबाई हिला उपचारासाठी कुडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले होते. ते उपचारासाठी बाहेर गेले असतानाच त्यांच्या घरावर ही दुर्दैवी आपत्ती ओढावली. या आगीत घरातील कपडे, घरगुती साहित्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे नाकतोडे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले असून, पुन्हा संसार उभा करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले आहे. प्रशासनाने घटनेची पाहणी करून पंचनामा केले. यावेळी तलाठी जाधव, ग्रामपंचायत अधिकारी वंदना झोडे, सरपंच मनोज भरर्ये, व तहसील कार्यालयचे कर्मचारी उपस्थित होते. आणि नाकतोडे कुटुंबाला तातडीने शासकीय मदत व आर्थिक नुकसानभरपाई उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Wie op zoek is naar een betrouwbaar online casino wil vaak eerst de voorwaarden en het spelaanbod vergelijken voordat er een account wordt aangemaakt. Nederlandse spelers letten daarbij op zaken als de beschikbaarheid van populaire gokkasten, tafelspellen en live casino-opties, evenals op de snelheid van uitbetalingen en de kwaliteit van de klantenservice. Een overzicht van actuele promoties kan handig zijn, zoals bijvoorbeeld de NyxBets Bonussen, waarmee nieuwe leden hun eerste storting kunnen verdubbelen of gratis spins op geselecteerde slots ontvangen. Daarnaast is het verstandig om te controleren of de aanbieder beschikt over een geldige vergunning van de Kansspelautoriteit, zodat je zeker weet dat persoonlijke gegevens veilig worden verwerkt en dat eerlijk spel wordt gegarandeerd door onafhankelijke testinstanties.