शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखावर प्राणघातक हल्ला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : गुरुवार २० आॅगस्ट रोजी मध्यरात्री गोंदिया शहरातील पोवार बोर्डिंग येथे शिवसेना जिल्हाप्रमुख रूपेश कुथे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याच्या आरोपाने राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे. युवा सेनेचे कार्यकर्ते ऋषभ मिश्रा आणि ‘रजा भाई’ यांनी हल्ला केल्याचा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख रुपेश कुथे यांनी केला असून, याप्रकरणी त्यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारी नोंदवून तपास सुरू केला आहे. शुक्रवार २१ आॅगस्ट रोजी उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाच्या तयारीसाठी पोवार बोर्डिंग येथे बैठक व अन्य नियोजन सुरूअसताना ही घटना घडली. कार्यक्रमस्थळी आपला फलक प्रमुख ठिकाणी लावण्यात यावा तसेच मंचावर स्थान मिळावे, या मागणीवरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याचा आरोप आहे. जिल्हा प्रमुख रुपेश कुथे यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत आपल्यावर मद्यधुंद अवस्थेत युवा सेनेचे कार्यकर्त्यांनी सशस्त्र हल्ला करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या घटनेमागे युवा सेनेचे ऋषभ मिश्रा व रजा भाई यांचा सहभाग असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, मिश्रा यांच्यावर लोकांमध्ये दहशत निर्माण करून खंडणी वसूल करतात असे गंभीर आरोप कुथे यांनी केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे शिवसेने (शिंदे) तील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. विशेष म्हणजे, मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या गोंदिया दौºयाच्या पूर्वसंध्येलाच हा प्रकार घडल्याने पक्षांतर्गत वादाला कोणते वळण मिळते, याकडे राजकीय वतुर्ळाचे लक्ष लागले आहे. रामनगर पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून, हल्ल्याचे नेमके कारण आणि सहभागींची भूमिका तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *