स्टेशन रोडवरील प्रस्तावीत दारू दुकानाला नागरीकांचा विरोध

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : प्रगती कॉलनी व सुयोग नगर, स्टेशन रोड परिसरातील नागरिकांनी सिल्वर स्प्रिंग अपार्टमेंटमधील दुकान क्रमांक ३ येथे प्रस्तावित बिअर व वाईन शॉपीला तीव्र विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून सदर दुकानाला देण्यात येणारी परवानगी रद्द करण्याची मागणी केली. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, प्रस्तावित मद्यविक्रीचे दुकान हे पूर्णपणे निवासी परिसरात आहे. या भागात महिला, लहान मुले, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळअसते. दुकानालगतच दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे दुकान असून तेथे महिला व कुटुंबांची नियमित ये-जा असते. तसेच प्रस्तावित दुकानापासून अवघ्या ६० ते ७० फूट अंतरावर मंदिर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.मद्यविक्रीचे दुकान सुरू झाल्यास परिसरात गर्दी, वादविवाद, वाहतुकीची कोंडी तसेच महिलांना त्रास होण्याची शक्यता असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली.

दुकानासमोर मागील आठ वर्षांपासून संतकृपा सभागृह अँड लॉन सुरू आहे. येथे होणाºया विविध समारंभांना येणाºया नागरिकांकडून प्रस्तावित दुकानातून मद्य खरेदी करून परिसरातच मद्यसेवन झाल्यास गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताही निवेदनात व्यक्त करण्यात आली. दरम्यान, सिल्वर स्प्रिंग अपार्टमेंटमधील दुकानांच्या नोंदणीकृत विक्री दस्तऐवजात मद्य, बिअर व वाईन विक्रीचा व्यवसाय करण्यास प्रतिबंध असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. त्यामुळे संबंधित दस्तऐवजांची सखोल तपासणी करून प्रस्तावित मद्यविक्रीच्या दुकानाला परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर परिसरातील ५० हून अधिक नागरिकांनी स्वाक्षºया केल्या. यावेळी अ‍ॅड. राजकुमार वाडीभस्मे, रमेश नागपूरे, खुशाल आकरे, सुरेश मोहबंसी, राजू जगनाडे, ए. के. मेहर, रामकृष्णाजी गिरीपुजे, राजकुमार गभने आणि रमेश बनकर उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *