३५ वर्षीय बेरोजगार युवकाची आत्महत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयात उडी घेऊन एका ३५ वर्षीय बेरोजगार युवकाने आत्महत्या केल्याची दुदैर्वी घटना रविवारी (१३ जुलै) उघडकीस आली. मृत युवकाची ओळख अजयकुमार शंकर सुरसाउत (वय ३५, रा. इंदोरा खुर्द) अशी करण्यात आली असून, प्राथमिक माहितीनुसार आर्थिक अडचणींमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी बोदलकसा जलाशयात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना दिसल्याची माहिती तिरोडा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस ठाण्याचे हवालदार नीलकंठ रक्षे व पोलीस शिपाई नितीन मेश्राम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने मृतदेह जलाशयातून बाहेर काढण्यात आला. मृत व्यक्तीची ओळख इंदोरा खुर्द येथील अजयकुमार शंकर सुरसाउत अशी पटली. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अजयकुमार हे १२ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परतले नव्हते.प्राथमिक तपासात मृत युवक बेरोजगार असून आर्थिक अडचणींना सामोरे जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आर्थिक विवंचनेतून त्यांनी जलाशयात उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *