३६ दिवस उलटूनही चौकशी ‘थंडबस्त्यात’!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाºयांनी आपल्या पदाचा थेट गैरवापर करत शासकीय योजनांचा लाभ स्वत:च्या आणि नातेवाईकांच्या खाजगी व्यवसायांना मिळवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सत्ताधारी पक्षाचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना कृषिमंत्र्यांनी या गंभीर गैरव्यवहा- राची थेट कबुली दिली असून, यामुळेनागपूर विभागातील कृषी वतुर्ळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, खुद्द कृषी राज्यमंत्र्यांनी चौकशीचे निर्देश दिले असताना आणि आमदारांनी हा मुद्दा विधानसभेत लावून धरला असतानाही तब्बल ३६ दिवस उलटूनही संबंधित अधिकाºयावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. कारवाईऐवजी चौकशी थंडबस्त्यात गुंडाळली गेल्यामुळे हे प्रकरण राजकीयवर्चस्वाखाली आणि दडपणाखाली दडपले जात आहे का, असा सवाल आता नागरिक व शेतकºयांमधून विचारला जात आहे.

माहिती अधिकार कायद्याचा आडोसा; माहिती देण्यास नकार

या घोटाळ्याशी संबंधित पदमाचल अ‍ॅग्रो मार्ट अ‍ॅन्ड एजन्शी, पदमाचल कृषी सेवालय आणि क्रिपान ग्रीन क्रॉप सायन्स (लाखनी) या संस्थांच्या चौकशी अहवालाची व व्हिडियो/आॅडिओ क्लिपची मागणी माहिती अधिकार अंतर्गत करण्यात आली होती. मात्र, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, भंडारा यांचे , दि. १३.०७. २०२६ चे पत्र क्र. १७११/ २०२६ द्वारे माहिती अधिकार अधिनियम कलम ८ (१) (एच) चा हवाला देत माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला. चौकशी अद्याप प्रगतीपथावर असून अंतिम निष्कर्ष प्रलंबित असल्याने ही माहिती देय ठरत नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *