४२ वर्षानंतर जुने मित्र पुन्हा एकत्र

१९८४ च्या दहावीच्या बॅचचा स्नेह मिलन सोहळा; जुन्या आठवणींना उजाळा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी

लाखांदूर : काळ बदलला, परिस्थिती बदलली, डोक्यावरचे केस पांढरे झाले आणि आयुष्याच्या जबाबदाऱ्या वाढल्या; मात्र मैत्रीच्या आठवणी तशाच कायम राहिल्या. तब्बल ४२ वर्षांनंतर जिल्हा परिषद हायस्कूल दिघोरी/मोठी येथील १९८४ च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थी रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी एका विशेष स्नेह मिलन सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले. जुन्या मित्र-मैत्रिणींना तब्बल चार दशकानंतर भेटण्याचा योग आल्याने संपूर्ण परिसर भावूक आणि आनंदी वातावरणाराने भारून गेला.

प्रदीर्घ कालावधीनंतर आपल्या जुन्या शाळेच्या अंगणात पाऊल ठेवताच अनेकांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. एकमेकांना पाहताच मिठी मारणं, जुन्या टोपणनावांनी हाक मारणं, शालेय जीवनातील गंमती-जमती तसेच पाटी-पेन्सिलच्या काळातल्या आठवणींना उजाळा देत मित्रमंडळींनी जुन्या आठवणींचा मनमुराद आनंद लुटला.

जुन्या आठवणींच्या वाटेवर ‘गावफेरी’

शाळेतील गप्पागोष्टी आणि आठवणींना उजाळा दिल्यानंतर सर्व मित्र-मैत्रिणींनी एकत्रितपणे गावातून ‘गावफेरी’ काढली. लहानपणी ज्या गल्लीबोळांत खेळले, बागडले आणि बालपण घालवले, त्याच वाटांवरून पुन्हा एकदा एकत्र फिरताना अनेकांच्या डोळ्यात जुन्या आठवणींनी अश्रू तरळले. गावातील ज्येष्ठ नागरिकांनीही आगळ्यावेगळ्या स्नेहबंधाचे कौतुक केले.

या स्नेह मिलन सोहळ्यासाठी अनेक माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी दूरवरून आपली कामे बाजूला ठेवून विशेष उपस्थिती लावली. त्यामुळे तब्बल ४२ वर्षांनंतरचा हा मिलन सोहळा सर्वांसाठी विस्मरणोर ठरणला [सर्वसाठी विस्मरणोर ठरणला].

हनुमानाचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात

सर्व सिद्धीदाता हनुमंत रायांच्या मंदिरात हनुमंताचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाला मोटघरे होते, तर उपाध्यक्षपदाची जबाबदारी रमेश बावनकुळे यांनी सांभाळली. विशेष अतिथी म्हणून सविता मल/माहेश्वरी उपस्थित होत्या. यावेळी सर्व मित्र-मैत्रिणींचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यालयाचे प्रास्ताविक श्रीराम हुकरे यांनी केले. त्यानंतर उपस्थित प्रत्येक माजी विद्यार्थ्याने आपल्या पत्नीसह स्वतःचा परिचय करून देत कुटुंबाची माहिती, मुलांचे शिक्षण व व्यवसाय तसेच गेल्या ४२ वर्षांच्या जीवनप्रवासातील अनुभव सर्वांसमोर मांडले. एकमेकांच्या जीवनातील यश, संघर्ष आणि वाटचाल ऐकताना अनेक मित्र भारवून गेले.

जुन्या शाळेला सप्रेम भेट देण्याचा निर्णय

या स्नेह मिलन सोहळ्यात आपल्या जुन्या शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेला सप्रेम भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे विद्यार्थीदशेत ज्या शाळेने घडविले, त्या शाळेशी असलेले ऋणानुबंध पुन्हा दृढ करण्याचा संकल्प मित्रमंडळींनी केला.

कार्याक्रमाचे संचालन योगेश कुटे यांनी केले, तर गिरधारी भैषारे यांनी आभार मानले. दुपारच्या भोजननंतर सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. मात्र, निरोप घेताना ही मैत्री यापुढील अशीच टिकवून ठेवण्याचा आणि पुन्हा लवकरच एकत्र येण्याचा संकल्प सर्वांनी केला. कार्यक्रमाच्या यशासाठी संयोजक मित्रांनी विशेष परिश्रम घेतले [विशेष परिश्रम घेतले].

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *