आयपीएल क्रिकेटवर सट्टा, चौघांविरोधात गुन्हा नोंद

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तुमसर शहरात आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणाºया विरोधात भंडारा स्थागुशा विभागाच्या अधिकाºयांनी कारवाई करीत एकाला ताब्यात घेत चार आरोपी विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीकडुन २६ हजार ५०० रूपयांचा मुद्देमालही जप्त केला. आयपीएल क्रिकेट सामन्यावर तुमसर शहरात सट्टा खेळल्या जात असल्याची गुप्त माहिती ांडारा स्थागुशा विभागाचे पोनि. नितीन चिंचोळकर यांना मिळाली.त्या आधारे स्थागुशा पथकाने ४ एप्रिल २०२६ रोजी तुमसर शहरातील मुकेश भजीया सेंटर या दुकानात धाड टाकली असता मुकेश दिलीप मदारकर, वय २१ वर्ष, रा. शिवाजी नगर, तुमसर हा सुरु असलेल्या राजस्थान रॉयल्स विरुध्द गुजरात च्या सामन्यावर आॅनलाईन सट्टा खेळविताना मिळुन आला. त्याच्या ताब्यातुन जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये संजु पटले, रा. गोंदीया, नविन अग्रवाल, वय ३८ वर्ष, रा. शिवाजी नगर, तुमसर व संजय हंसराज साठवणे, वय ३५ वर्ष, रा. तुमसर यांच्याशी सट्ट्याची देवाण घेवाण झाल्याचे दिसुन आले. पोलीसांनी मुकेश दिलीप मदारकर याच्या ताब्यातुन एक मोबाईल फोन व नगदी रक्कम असा एकुण २६ हजार ५०० रु.चा मुद्देमाल जप्तकरुन चारही आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन तुमसर येथे अप. क्र. ५२९/२६ कलम १२ (अ) म. जु. का. सह कलम ४९, ३ (५) भा. न्या. सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.सदरची कारवाई भंडारा चे पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पो.नि. नितीन चिंचोळकर, पो.उपनि. प्रविन पाटील, पो.हवा. कैलाश पटोले, पो.हवा. अंकुश गाढवे, पो.शि. सुरज गभने यांनी केली. पुढील तपास पो.स्टे. तुमसर चे अधिकारी करत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *