आर्थिक फसवणुकीसाठी बँक खाते भाड्याने देणारा आरोपी तिरोडा पोलिसांच्या जाळ्यात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तिरोडा पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत आर्थिक फसवणूक करणाºया टोळीला स्वत:चे बँक खाते वापरण्यासाठी उपलब्ध करून देणाºया एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात आरोपीने स्वत:च्या नावावरील बँक खाते फसवणूक करणाºया टोळीला वापरण्यास दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तिरोडा पोलीस ठाण्यात १६ ते २० जुलैदरम्यान आर्थिक फसवणुकीचे पाच गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यांमध्ये अनुक्रमे ९४ हजार, ६४ हजार ५८४, १ लाख ४९ हजार ३४५, ६९ हजार ४२३ आणि २ लाख २९ हजार ८२६ रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या पाचही गुन्ह्यांमध्ये मिळून सुमारे ६ लाख ७ हजार १७८ रुपयांची आॅनलाइन फसवणूक झाल्याची नोंद आहे.

तपासादरम्यान काही व्यक्तींनी स्वत:च्या किंवा त्यांच्या फर्मच्या नावावर बँक खाती उघडून ती सायबर फसवणूक करणाºया टोळ्यांना भाड्याने अथवा वापरासाठी दिल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करत आरोपींचा शोध सुरू केला. पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गुल्हाने व पोलीस निरीक्षक अमित वानखडे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने कारवाई करत करण मनोहर मेश्राम (वय २७), रा. गौतम बुद्ध वॉर्ड, रेल्वे चौकी परिसर, तिरोडा याला अटक केली.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कवडे, विनायक दडस पाटील, उपनिरीक्षक संजय नष्टे, महिला उपनिरीक्षक प्रियंका बैस, हवालदार दीपक खांडेकर तसेच पोलीस शिपाई धनंजय बारळी आणि सचिन मेश्राम यांनी केली.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

तिरोडा पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपले बँक खाते, एटीएम कार्ड, चेकबुक किंवा इंटरनेट बँकिंगची माहिती देऊ नये. तसेच खाते भाड्याने देण्याची किंवा नवीन खाते उघडून त्याचा वापर इतरांना करण्यास सांगितल्यास त्वरित तिरोडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. अशा प्रकारच्या सावधगिरीमुळे सायबर फसवणुकीला आळा घालण्यास मदत होईल.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *