कबड्डी निवड चाचण्यांपासून प्रमाणपत्र वाटपापर्यंत गैरप्रकारांचे आरोप

भंडारा पत्रिका / तालुका प्रतिनिधी

मोहाडी : ॲमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचे अधिकृत क्रीडा कॅलेंडर प्रसिद्ध झालेले नसतानाच १५ ते १८ जानेवारी २०१७ रोजी होणाऱ्या ७३ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी तब्बल एक वर्ष ११ महिने आधी निवड चाचण्या घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. एवढ्या दीर्घ कालावधीपूर्वी निवड चाचणी घेणे क्रीडा नियमावली आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचा दावा मोहाडी येथील पत्रकार परिषदेत करण्यात आला.

मोहाडी येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या वार्ताहर परिषदेला हरजंदर सिंग सोखी, वासुदेव गरवारे, मुकेश कांबळे, धनंजय चवळे यांच्यासह खेळाडू देवेंद्र बांडेबुचे आणि रोशन कांबळे उपस्थित होते. ७२ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत गैरव्यवहार झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. गुणवंत खेळाडूंची मूळ प्रमाणपत्रे परस्पर रोख रक्कम घेऊन विकण्यात आली, तसेच प्रत्यक्ष स्पर्धेत न खेळलेल्या काही खेळाडूंना पैशांच्या मोबदल्यात बनावट प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे शुभम मेंढे, गौरव राऊत आणि विजय मरस्कुले यांसारखे मूळ खेळाडू त्यांच्या हक्कापासून वंचित राहिल्याचे सांगण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *