भंडारा पत्रिका / प्रतिनिधी किटाडी : किटाडी ग्रामपंचायतीने दारू दुकानासाठी ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्याच्या प्रक्रियेबाबत ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला असून, सदर एनओसी रद्द करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित विभागाच्या अधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सन २०२५ मध्ये झालेल्या ग्रामसभेदरम्यान दारू दुकानासाठी ठडउ देण्यासंदर्भात ग्रामस्थांच्या स्वाक्षºया घेण्यात आल्या. मात्र, त्या स्वाक्षºया नेमक्या दारू दुकानाच्या एनओसी साठी घेतल्या जात आहेत, याची स्पष्ट माहिती संबंधित ग्रामस्थांना देण्यात आली नव्हती, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
स्वाक्षºया घेताना विषयाची संपूर्ण माहिती ग्रामस्थांना देण्यात आली होती का, ग्रामसभेतील ठराव व कार्यवाही नियमानुसार झाली आहे का, तसेच एनओसी देताना शासनाच्या सर्व नियम व अटींचे पालन करण्यात आले आहे का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दारू दुकानामुळे गावातील सामाजिक वातावरण, महिला, युवक तसेच विद्यार्थ्यांवर होणाºया संभाव्य परिणामांचा विचार करून गावात दारू दुकानाला परवानगी देऊ नये, अशी भूमिका अनेक ग्रामस्थांनी घेतली आहे. त्यामुळे संबंधित एनओसी तात्काळ रद्द करून वस्तुनिष्ठ चौकशी करण्यात यावी आणि चौकशीत दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. या प्रकरणात जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत विभाग तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने गांभीर्याने दखल घेऊन ग्रामस्थांच्या तक्रारीची चौकशी करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली .