भंडारा पत्रिका / प्रतिनिधि
भंडारा : क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या भंडारा जिल्हाध्यक्षपदी सुरज निंबार्टे यांची निवड झाली आहे. अमरावती येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या विदर्भ आढावा बैठकीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते रविकांत तुपककर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष राजीव कसबे यांच्या आदेशानुसार हे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले आहे. रविकांत तुपककर हस्ते सुरज निंबार्टे यांना क्रांतिकारी बिला लावून संघटनेत प्रवेश देण्यात आला. याच बैठकीत त्यांच्या जिल्हाध्यक्षपदाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
सुरज निंबार्टे यांनी शेतकऱ्यांच्या बिकट स्थितीकडे लक्ष वेधले. या निवडिमुळे भंडारा जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अधिक प्रभावी वाचा फुटेल असा विश्वास संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. सुरज निंबार्टे यांनी आजवर शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहे. त्यांच्या याच उल्लेखनीय सामाजिक कार्याची व संघटन कौशल्याची दखल घेऊन क्रांतिकारी शेतकरी संघटनेने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.