
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: शासनाने प्रदूषणमुक्त इंधनाचा नारा देत रॉकेलचा पुरवठा बंद केला आणि उज्वलासह विविध योजनांतून घरोघरी गॅस पोहचवला. मात्र, आज हाच गॅस सर्वसामान्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. गॅसचा तुटवडा आणि बुकिंगमधील तांत्रिक अडचणींमुळे नागरिक त्रस्त असून, या प्रश्नी माजी आमदार चरण वाघमारे यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.