भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील १३ जण हे गोंदिया ला लागून असलेल्या मध्यप्रदेश येथील बालाघाट जिल्ह्यात जुगार खेळत असताना बालाघाट जिल्ह्यातील नवेगाव ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्यीय जुगाºयांविरुद्ध मोठी कारवाई करत गोंदियातील १३ सह १४ आरोपींना अटक केली आहे. पोलिस अधीक्षक बालाघाट यांच्या निदेर्शानुसार जिल्ह्यात जुगार, सट्टा आणि अवैध धंद्यांवर कारवाई सुरू आहे. याच अनुषंगाने नवेगाव ग्रामीण ठाण्याचे प्रभारी उपनिरीक्षक रमेश जाट यांच्या पथकाला माहिती मिळाली की, ग्राम खुरसोडी येथे ओमप्रकाश नगपुरे यांच्या गोदामातील टीन शेडखाली काही लोक ताशाच्या पत्त्यांवर हार-जीतचा डाव लावून जुगार खेळत आहेत.
माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ छापा टाकून घेराबंदी केली. यावेळी १४ आरोपी जुगार खेळताना रंगेहाथ पकडले गेले. ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी आरोपींकडून आणि जुगाराच्या फडातून १ लाख ५० हजार २०० रुपये रोख रक्कम आणि ताशाच्या पत्त्यांच्या ३ गड्ड्या जप्त केल्या. तसेच १४ अँड्रॉइड मोबाईल फोन किंमत सुमारे २ लाख ५० हजार रुपये जप्त केले. याशिवाय आरोपींकडून ३ चारचाकी वाहने देखील जप्त करण्यात आली ओमप्रकाश नगपुरे यांच्याकडून टाटा सफारी कार एमएच ३५ अह ६०८० किंमत सुमारे २१ लाख रुपये, शिवकुमार खैरवार यांच्याकडून व्हिटारा ब्रेझा कार एमएच ३५ अॠ ६६९७ किंमत सुमारे ५ लाख रुपये, कमलेश नगपुरे यांच्याकडून किया सोनेट कार एमएच ३५ अह ९१८३ किंमत सुमारे ८ लाख रुपये अशाप्रकारे एकूण सुमारे ३८ लाख २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पकडलेल्या १४ पैकी १३ आरोपी गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी आणि गोंदिया ग्रामीण परिसरातील आहेत.
ओमप्रकाश नागपुरे, वय ४० वर्ष, शिवकुमार खैरवार, महा वय ४७ वर्ष, नरेश नागरीकर, वय ५४ वर्ष, आदित्य तुरकर महा, वय २१ वर्ष, भरत लिल्हारे, वय ४६ वर्ष, कमलेश नागपुरे, वय ३६ वर्ष, मंगल मस्करे, महायुग ४४ वर्ष, सुधीर रोडगे, वय ३३ वर्ष, रंजीत बरेले, वय ४८ वर्ष, विशाल मेण्डे, वय ३३ वर्ष, पंकज नागपुरे, वय ३० वर्ष, खेमेंद्र बिरनवार, वय ३९ वर्ष, जगदीश प्रसाद तिवडे, वय ४० वर्ष, हे सर्व राहणारा निवासी सावरीटोला, थाना रावणवाड़ी, जिला गोंदिया (महाराष्ट्र) तर एक आरोपी ओमप्रकाश दशहरे हा बालाघाट जिल्ह्यातील खुरसोडी येथील रहिवासी आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक २४७/२०२६, कलम ११२ बीएनएस आणि १३ पब्लिक गॅम्बलिंग अॅक्ट नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईत ठाणे प्रभारी रमेश कुमार जाट, उपनिरीक्षक सकरू सिंह धुर्वे यांच्यासह नवेगाव ग्रामीण पोलिसांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.