डोंगरा बुजुर्ग रेल्वे स्टेशन परिसरात दिसाढवळ्या वाघाचे दर्शन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

गरा बघेडा : डोंगरा बुजुर्ग येथील रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या शिव मंदिर परिसरात आज दुपारी सुमारे एक वाजताच्या सुमारास वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरा बुजुर्ग येथील शाम बिसने तसेच उपसरपंच तोलानी यांना शिव मंदिराजवळ वाघ दिसून आला. दिसाढवळ्या वाघाचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

रेल्वे स्टेशन परिसरात नागरिकांची वर्दळ असते. त्यातच वाघाचा वावर आढळून आल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वनविभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन परिसराची पाहणी करावी तसेच वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप लावून गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, नागरिकांनी वाघ दिलस्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करू नये आणि वनविभागाला तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *