तिरोडा-खैरलांजी मार्गावर वाकलेले पिंपळाचे झाड ; अपघाताचा धोका

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा-खैरलांजी आंतरराज्य मार्गावरील करटी बुजरूक गावाजवळ मोठे पिंपळाचे झाड रस्त्याच्या दिशेने वाकल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गावरून ये-जा करणाºया वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, संबंधित यंत्रणेने तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे करटी बुजरूक गावाजवळील उंच पिंपळाचे झाड रस्त्याच्या दिशेने वाकले आहे. या मार्गावर लहानमोठ्या वाहनांसह अर्जुनी, बालाघाट व गोंदियाकडे जाणाºया एसटी बसची मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. त्यामुळे हे झाड अचानक कोसळल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी पावसाळ्यात तिरोडा-वडेगाव मार्गावरील सतोना गावाजवळ रस्त्यावर झाड कोसळून मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर आठवडाभरातच मेंढा-गोरेगाव मार्गावर मोटारसायकलवर झाड कोसळून एक युवक जखमी झाला होता. या पार्श्वभूमीवर करटी बुजरूकजवळ वाकलेले पिंपळाचे झाडही धोकादायक ठरू शकते. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून झाड हटवावे किंवा आवश्यक ती सुरक्षिततेची उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *