तुमसर बाजारात ५० हजार रुपयांचा आकर्षक लाकडी नंदी बैल विक्रीसाठी दाखल; बच्चेकंपनीमध्ये उत्साह

मोरेश्वर बिसने/भंडारा पत्रिका तुमसर : भारत हा कृषिप्रधान देश असून, भारतीय संस्कृतीतील अनेक सणउत्सवांचा शेतीशी अतूट संबंध आहे. शेतकºयाचा वर्षभराचा सच्चा साथीदार असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा पोळा हा विदर्भातील महत्त्वाचा पारंपरिक सण आहे. पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवून त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखविला जातो. विदर्भातील पोळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे ‘तान्हा पोळा’. पोळ्याच्या दुसºया दिवशी पाडव्याला लहान मुले तसेच नागरिकांकडून लाकडी बैलांची पूजा करून तान्हा पोळा साजरा करण्याची परंपरा आहे. ही परंपरा आजही मोठ्या उत्साहाने जपली जात आहे. यंदाच्या तान्हा पोळ्याच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील तुमसरशहरातील बाजारपेठेत विविध आकारांचे आणि आकर्षक रंगसंगतीतील लाकडी नंदी बैल विक्रीसाठी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे तब्बल ५० हजार रुपये किमतीचा आकर्षक लाकडी नंदी बैल बाजारातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *