तुमसर रोड रेलवे स्थानकाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या

◆ सुधाकर कारेमोरे यांची मागणी

◆ शिवसेना (उबाठा) पक्षाचे रेल्वेमंत्र्यांना निवेदन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी

तुमसर : तुमसर रोड रेलवे स्थानकाला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हा समन्वयक सुधाकर कारेमोरे यांच्या पुढाकाराने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना तहसीलदार, तुमसर यांच्यामार्फत निवेदन सादर करून ही मागणी करण्यात आली.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात दिलेले योगदान, तसेच मराठी माणसांच्या हक्कांसाठी केलेला संघर्ष लक्षात घेता, त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जतन करण्यासाठी तुमसर रोड रेलवे स्थानकाचे नामकरण ‘शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे रेलवे स्थानक’ असे करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तुमसर रोड रेलवे स्थानक हे भंडारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे रेलवे स्थानक असून, या स्थानकावरून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. परिसरातील नागरिक, व्यापारी आणि प्रवाशांच्या दृष्टीने या स्थानकाला विशेष महत्व आहे. अशा महत्त्वाच्या रेलवे स्थानकाला बाळसाहेब ठाकरे यांचे नाव दिल्यास त्यांच्या कार्याचा सन्मान होईल आणि त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल, अशी भूमिका सेनेच्या वतीने मांडण्यात आली. केंद्र सरकारने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन नामकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी आणि आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया ताաडीने पूर्ण करावी, अशी विनंतीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सुधाकर कारेमोरे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पारधी, तालुकाप्रमुख ईश्वर भोयर, सत्यनारायण कामथे, महिपाल वहिले, राजेश कांबळे, राजकुमार गायकवाड, संतोष बोरकर, दिग्रेष खडसे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *